MPSC Exam: एमपीएसीची नवी जाहीरात, राज्य सेवा परीक्षेत 100 जागा वाढवल्या; परिपत्रक जाहीर
MPSC Twitter | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसवा आयोग (Maharashtra Public Service Commission) म्हणजेच एमपीएससीने (MPSC Exam) आनखी एक आनंदवर्ता दिली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 बाबत एक जाहीरात प्रसिद्ध झाली होती. या जाहीरातीनुसार राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 290 पदांसाठी 16 संवर्गात भरती केली जाणार होती. आता यात 100 पदांची वाढ केली जामार आहे. त्यामुळे एमपीएससी आता एकूण 390 पदांसाठी भरती करेल. त्यासाठी 2 जानेवारी 2022 साठी पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. एमपीएससीने पदसंख्येत वाढ केल्यामुळे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, 2 जानेवारी रोजी पार पडणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहीरात एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. एमपीएससीने आपल्याै ट्विटर हँडलवरुनही याबाबत माहिती दिली आहे.  (हेही वाचा, MPSC Twitter Handle: महाराष्ट्र लोकसेवा आयोग कार्यालयाचे एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी अधिकृत ट्विटर हँडल)

पदांचा तपशील

 • उपजजिल्हाधिकारी 12
 • पोलीस उपअधीक्षक 16
 • सहकार राज्य कर आयुक्त 16
 • गटविकास अधिकारी 15
 • सहायक संचालक
 • महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ 15
 • उद्योग उप संचालक 4
 • सहायक कामगार आयुक्त 22
 • उपशिक्षणाधिकारी 25
 • कक्ष अधिकारी 39
 • सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4
 • सहायक गटविकास अधिकारी 17
 • सहायक निबंधक सहकारी संस्था 18
 • उपअधीक्षक भूमि अभिलेख 15
 • उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर 1
 • उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1
 • सहकारी कामगार अधिकारी 54
 • मुख्याधिकारी गट ब 75
 • मुख्याधिकारी गट अ 15 पदं
 • उपनिबंधक सहकारी संस्था गट अ 10 पदं

दरम्यान, एमपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. तर पूर्व परीक्षेसाठीचे अर्ज 5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजलेपासून दाखल करण्यास सुरुवात होईल. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर असेल. खुल्या प्रवर्गातील उमेदवारास परीक्षा शुल्क 544 तर मागासवर्गीय उमेदावारंसाठी 344 रुपये इतके आकारण्यात येईल.