MPSC Twitter | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

एमपीएससी (MPSC) अर्थात कार्यालयाचे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) अधिकृत ट्विटर हँडल (MPSC Twitter Handle) सुरु झाले आहे. एमपीएससी कडून याबाबत शुक्रवारी (27 ऑगस्ट) सायंकाळी माहिती देण्यात आली. एमपीएसीकडून ट्विटर हँडलची घोषणा होताच त्याला जोरदार प्रतिसादही पाहायला मिळाला. आज (शनिवार, 28 ऑगस्ट) सकाळी 9 वाजेपर्यंत एमपीएससी ट्विटरचे 6,558 फॉलोअर्स झाले होते. एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना हे ट्विटर हँडल महत्त्वाचे मार्गदर्शन आणि मदत करणारे ठरण्यार असल्याचा विश्वास एमपीएससीने व्यक्त केला आहे.

एमपीएससीने दिलेल्या माहितीनुसार, या ट्विटर हँडलवरुन महत्त्वाचे निर्णय, त्याबाबतची पत्रकं, परिक्षांच्या तारखा, वेळापत्रक यांसह इतरही विविध गोष्टींची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे एमपीएससीच्या माहितीबाबत विद्यार्थ्यांना आता इतर गोष्टींकडे लक्ष देण्याची आवश्यकता राहणार नाही. त्यांना आपल्या मोबाईलच्या एका क्लिकवर आवश्यक माहिती मिळू शकेल. (हेही वाचा, MPSC Subordinate Service Admit Card 2021: दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 4 सप्टेंबरला; mpsc.gov.in वरून असं डाऊनलोड करा अ‍ॅडमीट कार्ड)

ट्विट

दरम्यान, एमपीएससीचे ट्विटर हँडल सुरु झाल्यानंतर विदायर्थी आणि स्पर्धा परीक्षा वर्तुळातून त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. परंतू, एमपीएससीने ट्विटरचा रिप्लाय ऑप्शन बंद ठेवला आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी एमपीएससी टिकेचे धनी ठरले आहे. विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या प्रश्नांच्या सरबत्तीला टाळण्यासाठीच एमपीएससीने ट्विटरवर रिप्लाय ऑप्शन बंद ठेवल्याची चर्चा आहे. कोरोना काळात रखडलेल्या परीक्षा आणि नियुक्त्या यावरुन आगोदरच विद्यार्थ्यांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे ट्विटर हँडलवरुन एमपीएससी पुन्हा एकदा टीकेचे धनी झाले आहे.