एमपीएससी ने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा (Maharashtra Subordinate Services Non-Gazetted, Group-B Combined Preliminary Exam 2020 )साठी अॅडमीट कार्ड जारी केले आहे. एमपीएससीची अधिकृत वेबसाईट mpsc.gov.in द्वारा हे अॅडमीट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. तर ही परीक्षा राज्यात 4 सप्टेंबर 2021 दिवशी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांना त्याचं अॅडमीट कार्ड डाऊनलोड साठी उपलब्ध करण्यात आले आहे.
MPSC Subordinate Service Admit Card for Group B कसं कराल डाऊनलोड?
- mpsconline.gov.in ला भेट दया.
- ‘ Download Admission Certificate’वर क्लिक करा.
- आता तुम्हांला संबंधित जाहिरातीवर क्लिक करून Mobile No./Aadhar No./Application Id.Email Id भरावे लागेल.
- आता तुमच्या अकाऊंट वर लॉगिन करा.
- MPSC Group B Prelims Admit Card डाऊनलोड करा.
इथे पहा अॅडमीट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी डिरेक्ट लिंक!
एमपीएससी कडून 806 जागांवर ही नोकराभरती होणार आहे. यामध्ये 650 जागा पोलिस सब इन्स्पेक्टर, 67 असिस्टंट सेक्शन ऑफिसर, 89 जागांवर स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर यांचा त्यामध्ये समावेश असेल. दरम्यान मागील वर्ष दीड वर्ष कोरोना संकटामुळे अनेकदा ही परीक्षा पुढे ढकलली गेली होती पण आता ती घेतली जात आहे. या परीक्षे दरम्यानही कोविड 19 च्या नियमावलीचं पालन करावं लागणार आहे.