Motilal Mansion Balcony Collapse : मुंबईत (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी इमारत कोसळल्याच्या घटना घडत आहेत. अशातच आता चार मजली मोतीलाल मॅन्शन (Motilal Mansion) च्या पहिल्या तीन मजल्यांच्या बाल्कनी (Balcony) चा काही भाग कोसळला आहे. ही इमारत केम्प्स कॉर्नर (Kemps Corner), नेपियन सी रोड येथे आहे. या घटनेत 12 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोतीलाल मॅन्शन (Motilal Mansion) हे मलबार हिल (Malabar Hill) येथे मुंबईतील सर्वात उच्च प्रोफाइल भागात स्थित आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या ग्रँट रोड परिसरात इमारतीची बाल्कनी कोसळून (Balcony Collapsed) एका महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच या घटनेत तीन जण जखमी झाले होते. ढिगाऱ्याखालून 13 जणांची सुटका करण्यात आली होती. (हेही वाचा -Mumbai Grant Road Building Collapse: ग्रँड रोड परिसरात चार मजली इमारतीचा भाग कोसळला; ढिगार्याखाली अनेक जण अडकल्याची भीती, रेस्क्यू ऑपरेशन सुरू)
मुंबईत यलो अलर्ट जारी -
मुंबई संततधार पाऊस सुरू आहे. शहर आणि उपनगरातील काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी 24 जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे, तर रायगडमध्ये मंगळवारपर्यंत ऑरेंज अलर्ट असेल. (हेही वाचा: Mumbai Rain Update:मुंबईत पावसाची धुवाधार बॅटींग; अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद (Watch Video))
तथापी, येत्या तीन तासांत मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि साताऱ्याच्या घाटांवर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. यासंदर्भात IMD ने अंदाज वर्तवला आहे.