Child (Photo Credits: Pixabay) Representational Image

Pune Shocker: पुणे जिल्ह्यातील जुन्नर (Junnar) तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 15 दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या नवजात मुलीबाबत धक्कादायक सत्य समोर आले आहे. आईने पोटच्या मुलीला डावा कालव्यात फेकल्याचे त्याच्या आईने मान्य केले आहे. त्यामुळे या मुलीच्या अपहरणाचा बनाव उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे राहणाऱ्या एका परप्रांतीय महिलेने 15 दिवसांपूर्वी जन्मलेल्या नवजात मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची फिर्याद शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आळेफाटा पोलीस ठाण्यात दिली. मात्र, तक्रार नोंदवताना महिलेने संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. मात्र, पोलिसांना कोणताही सुगावा लागला नाही. यानंतर पोलिसांना महिलेच्या वक्तव्यावर आणि तिच्या वागण्यावरून संशय आला. (हेही वाचा - Honey Trap Case in Pune: 78 वर्षीय व्यक्तीकडून लग्नाचं आमिष दाखवून डेटिंग अ‍ॅपच्या नावाखाली 1 कोटी उकळले)

सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी महिलेला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच संबंधित महिलेने जन्मलेल्या बाळाला पिंपळगाव कालव्यात फेकून दिल्याचे मान्य केले. (हेही वाचा - Domestic Violence Charges Vinod Kambli: क्रिकेटर विनोद कांबळी विरोधात पत्नी Andrea चे दारूच्या नशेत मारहाणीची आरोप; Bandra Police Station मध्ये FIR दाखल)

दरम्यान, पोलिसांकडून महिलेची चौकशी करण्यात येत असून पिंपळगाव जोगा डाव्या कालव्यात फेकलेल्या मुलाचा मृतदेह शोधण्यात येत आहे. याबाबतची माहिती समोर आली नसली तरी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. या घटनेने आळेफाटा परिसरात खळबळ उडाली आहे. कालवा पाण्याने भरत असताना अर्भक पाण्यात फेकले गेले. महिलेच्या कबुलीनंतर कालव्यातील पाणी कमी करून मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.