पुण्यामध्ये हनी ट्र्पमधून एका 78 वर्षीय वृद्ध व्यक्तीला 1 कोटींचा गंदा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जसं तंत्रज्ञान प्रगत झाले आहे तशा आता सायाबर क्राईमच्या घटना देखील अधिक वाढल्या असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये डेटिंग आणि सेक्सटोर्शनच्या गुन्ह्यांच्या वाढीचा देखील समावेश आहे. हनी ट्रॅप मध्ये व्यक्ती अडकल्यानंतर त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे उकळले जातात. त्यामुळे नागिरकांनी सोशल मीडीयाचा वापर जपून करावा आणि फसव्या आमिषाला बळी पडू नये असं सायबर विभागाकडून वारंवार आवाहन केले जाते.
दरम्यान पुण्यात एका 78 वर्षीय व्यक्तीला तरूणीसोबतची मैत्री महागात पडली आहे. पत्नीच्या निधनानंतर एकट्या पडलेल्या या वृद्ध व्यक्तीने नेहा शर्मा या तरूणीसोबत मैत्री केली. मोबाईल नंबरवरून नेहा या वृद्ध व्यक्तीशी बोलत होती. डेटिंग अॅप वरून मैत्री आणि त्यानंतर लग्नाचं त्यांना आमिष दाखवण्यात आले. या डेटिंग सेवेसाठी शुल्क भरावं लागेल असं सांगत त्यांनी काही पैसे भरले. कालांतराने रिफंडेबल चार्जेस म्हणत त्यांनी अजून पैशांची मागणी केली. जशी मागणी केली तसे या वृद्ध व्यक्तीने पैसे देखील भरले. पण एका टप्प्यावर आल्यावर तुम्ही बेकायदेशीर डेटिंग केली आता समाजात तुमकी बदनामी करू असं त्यांनी सांगितलं. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून त्यांनी अजून पैसे भरले. नक्की वाचा: परराष्ट्र मंत्रालय मध्ये ड्रायव्हर असलेल्या एका व्यक्तीला Delhi Police कडून पाकिस्तानला गोपनीय, संवेदनशील माहितीच्या आरोपाखाली अटक.
मे 2022 पासून सुरू झालेला हा प्रकार थांबतच नव्हता. त्यामुळे वृद्ध व्यक्तीने देखील सारा प्रकार सायबर पोलिसांकडे सांगितला. नेहा शर्मा आणि रजत सिन्हा यांच्यावर गुन्हा दाखल केला. के. बी. टेलिकॉम या डेटिंग कंपनी मधील डेटिंग सर्विस देण्याच्या नावाखाली ही सारी फसवणूक झाली. सध्या पोलिस या प्रकरणामध्ये अधिक सखोल तपास करत आहेत.