Pollution in India: भारतातील सर्वात प्रदूषित शहरांची नावे (Most Polluted Cities) पुढे आली आहेत. देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्ली (Delhi) शहरातील हवा सर्वात प्रदुषीत घोषीत करण्यात आली आहे. तर सर्वात प्रदूषित शहरांमध्ये फरीदाबाद हे सर्वात अव्वल आहे. प्रदूषित शहरांच्या टॉप-10 शहरांमध्ये हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील तीन शहरांचा समावेश आहे. देशभरात विविध शहरांमध्ये सुरु असलेली बांधकामे, रस्त्यांचे निर्माण, औद्योगिकरण, रस्त्यांवरील वाहनांची वाढती रहधारी यांसारख्या विविध गोष्टी प्रदुषण वाढीस कारणीभूत ठरताना दिसत आहेत.
राजधानी दिल्लीमध्ये AQI ची पातळी आज सकाळी 397 इतकी नोंदविण्यात आली. सर्वात प्रदूषित शहरांमध्ये हरियाणातील फरीदाबाद या शहराची नोंद आहे. या शहरात AQI स्तर 401 इतका नोंदविण्यात आला. (हेही वाचा, Penis is Shrinking for Real! वैज्ञानिकांच्या इशाऱ्यानंतर दीया मिर्जा हिचा नेटीझन्सना पर्यावरण संवर्धनाचा सल्ला)
सर्वात प्रदूषित शरहांची यादी
- फरिदाबाद
- दिल्ली
- मेरठ
- बागपत
- बहादुरगढ
- जींद
- हिसार
- नोएडा
- सिंगरौली
- गुरुग्राम
देशातील सर्वाधिक प्रदूषित 10 शहरांमध्ये हरियाणातील पाच शहरांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील तीन आणि मध्य प्रदेशातील एका शहराचा समावेशआहे. देशातील 25 शहरांची हवा अतिशय खराब या श्रेणीत येत आहे. यातील बहुतांश शहरं ही हरियाणा आणि उत्तर प्रदेश राज्यातील आहेत.