Monsoon Updates In Palghar: पालघर येथे अंगावर वीज पडून 2 जणांचा मृत्यू तर 6 जण गंभीर जखमी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पालघर जिल्ह्यात आज दुपार पासूनच मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी अंगावर वीज पडून 2 जणांचा बळी गेला आहे. तसेच अन्य 6 जण हे गंभीर स्वरुपात जखमी झाल्याची माहिती नागरी अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमी झालेल्या नागरिकांवर धुंदलवाडी मधल्या वेदांत रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे.(Mumbai Weather Forecast: मुंबई मध्ये पुढील काही दिवस बिनपावसाचे; कोरड्या वातावरणासह उकाडा वाढण्याची शक्यता)

वाडा तालुक्यात संध्याकाळच्या वेळेस वीजांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या वेळी पावसात भिजू नये म्हणून हे सर्वजण एका झाडाखाली उभे राहिले होते. मात्र त्यावेळी तरुणाच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. तर अन्य जण वीज पडल्यानंतर गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत.(Maharashtra Weather Update: मुंबईसह नाशिक, जुन्नरमध्ये काही वेळापुरता ढगांचा गडगडाट होणार मात्र पावसाची धुसर शक्यता- IMD)

दरम्यान,  6 सप्टेंबर पासून पावसाचा जोर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तर मुंबईत कोरडे वातावरण अनुभवायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच कोकणात दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे 9,10 सप्टेंबरला पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.