Cloudy Weather | Image used for representational purpose only | (Photo Credits: Pixabay)

मुंबईत गेल्या 3-4 दिवसांपासून पाऊस एकाएकी नाहीसा झाला असून अचानक तापमानात वाढ झाली आहे. यामुळे ऑक्टोबर महिना सुरु होण्याआधीच ऑक्टोबर हिट जाणवायला लागला आहे. आज मुंबईसह नाशिक,जुन्नर जिल्ह्यात ढगांचा गडगडाट ऐकायला मिळेल. मात्र पावसाची धुसर शक्यता असल्याचा अंदाज हवाान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच पुढील काही दिवस मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानात वाढ झालेली पाहायला मिळणार असल्यामुळे पावसाची शक्यता धुसरच आहे.

तर दुसरीकडे कोकणात दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे 9,10 सप्टेंबरला पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. Mumbai Weather Forecast: मुंबई मध्ये पुढील काही दिवस बिनपावसाचे; कोरड्या वातावरणासह उकाडा वाढण्याची शक्यता

गेल्या 4-5 दिवसांपासून वातावरणात झालेला हा बदल पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. दरम्यान या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी मुंबईकरांना केले आहे.

6 सप्टेंबर पासून पावसाचा जोर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तर मुंबईत कोरडे वातावरण अनुभवायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.