Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

मध्य रेल्वेच्या मंकी हिल ते कर्जत दरम्यान अप लाईन मार्गावर रेल्वे कामांसाठी येत्या 15 जानेवारी ते 20 जानेवरीपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुचना दिली आहे.राज्यात गेल्या वर्षात मुसळधार पाऊस पडल्याने रेल्वे रुळाला तडे जाणे किंवा अन्य तांत्रिक बाबींचे काम पूर्ण होणे अद्याप उर्वरित आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. पुणे-पनवेल पॅसेंजरसह चार गाड्या रद्द करण्यात आल्या असून, दोन गाड्यांच्या सेवेवर परिणाम होणार आहे.

>>रद्द करण्यात आलेल्या गाड्यांचे वेळापत्रक:

-गाडी क्रमांक 51317/51318 पनवेल-पुणे-पनवेल ही गाडी दिनांक 16 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे.

-51027 सीएसएमटी-पंढरपुर ही गाडी दिनांक 16 जानेवारी ते 18 जानेवारी पर्यंत रद्द

-51028 पंढरपूर-सीएसएमटी गाडी दिनांक 17 जानेवारी ते 19 जानेवारी पर्यंत रद्द

-51029/51030 सीएसएमटी-बीजापूर-सीएसएमटी ही गाडी दिनांक 15 जानेवारी, 16 जानेवारी आणि 20 जानेवारीला रद्द

>>गाड्यांच्या मार्गिकेत बदल

-11025/11026 भुसावळ-पुणे-भुसावळ एक्सप्रेस दिनांक 16 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत मनमाड-दौंड या मार्गावरुन धावणार आहे.

>>गाड्यांचे शार्ट टर्मिनेशन/ शार्ट ओरिजनेशन

-कोल्हापूर-सीएसएमटी कोयना एक्सप्रेस दिनांक 16 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत पुणे येथे साप्ताहिक सुरु होणार आहे.

त्यामुळे वरील बदलेल्या वेळापत्रकानुसार प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. मंकी हिल ते कर्जतदरम्यान गेल्या वर्षात 21 ऑक्टोबरला 10 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. परंतु, या कालावधीत या मार्गावरील कामे पूर्ण झाली नाही. त्यामुळे पुढील महिनाभर म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत मंकी हिल ते कर्जतपर्यंत मेगा ब्लॉग पर्यंत पुढे ढकलण्यात आला. या रेल्वे  ब्लॉकमुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत बाहेरगावी गेलेल्या प्रवाशांचे हाल झाल्याचे दिसून आले. रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉकमुळे 22 एक्सस्प्रेस रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते.