Mumbai Local Power Block: मुंबई मध्ये 19-21 एप्रिल दरम्यान मध्य रेल्वे कडून पॉवर ब्लॉक; हार्बर आणि मेन लाईन वर होणार 'हे' बदल
Mumbai Local Train | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) च्या रूंदीकरण्याच्या कामासाठी 19, 20 आणि 21 एप्रिल दिवशी मध्य रेल्वे कडून पॉवर ब्लॉक (Power Block) घेण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर लाईन वरील सेवा विस्कळीत होणार आहेत. मध्य रेल्वे वर रात्री 12.14 ची सीएसएमटी ते कसारा ही शेवटची लोकल असणार आहे. कर्जत, ठाणे ट्रेन रद्द करण्यात आली आहे. यामुळे कर्जत, खोपोली मध्ये जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

पॉवर ब्लॉक मुळे सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा या अपा आणि डाऊन मार्गावरील सेवा विस्कळीत होणार आहेत. या मार्गावर मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 या वेळात ट्रेन धावणार नाही. या मार्गावरील मेल आणि एक्स्प्रेस गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या मेन लाईन वर लोकल सेवेतील हे बदल ठेवा लक्षात

शेवटची लोकल - कसारा, जी CSMT स्थानकातून 12.14 ला सुटेल.

पहिली लोकल (ब्लॉक नंतर) - कर्जत, जी सीएसएमटी स्थानकातून पहाटे 4.47 ला सुटेल.

ब्लॉक पूर्वी अप स्लो मार्गावर कल्याण मधून शेवटची लोकल 22.34 ला सुटेल.

मध्य रेल्वेच्या हार्बर लाईन वर लोकल सेवेतील हे बदल ठेवा लक्षात

ब्लॉक पूर्वी पहिली लोकल मध्य रात्री 00.13 वाजता CSMT मधून सुटेल.

ब्लॉक नंतर CSMT मधून पहिली लोकल 04:52 ला सुटेल.

ब्लॉक पूर्वी शेवटची लोकल पनवेल मधून 22.46 ला सुटेल

ब्लॉक नंतर शेवटची लोकल पहाटे 4.17 ला वांद्रे स्थानकातून सुटेल.

19-21 एप्रिल च्या ब्लॉक मध्ये कोणत्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम?

12870 हावडा -सीएसएमटी Atijald Express,12052 मडगाव-सीएसएम्टी जनशताब्दी एक्सप्रेस, 22120 मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस, 11058 अमृतसर-सीएसएमटी एक्सप्रेस, 11020 भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेस, 12810 हावडा-सीएसएमटी मेल एक्सप्रेसचा शेवटचा थांबा दादर स्थानकामध्ये असणार आहे.