MNS अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात Lockdown ने शिकवलेलं कळलं तरी World Environment Day चं सार्थक झालं
Raj Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day 2020) निमित्त खास संदेश दिला आहे. आपण लॉकडाऊन (Lockdown) काळात आहोत म्हणून हे प्राणी पक्षी त्यांच्या हक्काच्या अधिवासात मुक्त संचार करू शकत आहेत. आपण त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केलंय त्यांनी आपल्या नाही; हे जरी ह्या टाळेबंदीने शिकवलं तरी World Environment Day चं सार्थक झालं म्हणता येईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे यांनी जागतिक पर्यावरण दिन आणि लॉकडाऊन यांचा संबंध जोडला आहे.

कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी जगभरातील विवध देशांनी लॉकडाऊन लागू केला आहे. लॉकडाऊन काळात जवळपास अखंड मानव समाज घरात बंदिस्थ आहे. अशा काळात निसर्गातील प्राणी पक्षी मुक्त संचार करत आहेत. त्यामुळे जंगली प्राणी, पक्षी मानवी परिसरातही आल्याचे पाहायला मिळाले. खरे म्हणजे हे प्राणी पक्षी मानवी परिसरात आले नव्हते तर, ते मनुष्यव्याप्त त्याच्याच भागात आले होते. लॉकडाऊन काळात पर्यावरणही मोठ्या प्रमाणावर स्वच्छ झाल्याचे पाहायला मिळाले. हवा, पाणी आणि माती प्रदुषणातही मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे पाहायला मिळाले. (हेही वाचा, World Environment Day 2020: पर्यावरण दिनानिमित्त सुप्रिया सुळे, राजेश टोपे, अनिल देशमुख यांच्यासह राजकीय मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा!)

Uddhav Thackeray: लोकप्रियतेत माझा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर कसे येईल हेच ध्येय - Watch Video 

दरम्यान, जागतिक पर्यावरण दिनानमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या वेळी दरवर्षीप्रमाणे अनेक लोक एकत्र न येता आपापल्या घरीच थांबून पर्यावरणविषयक कार्यक्रमात सहभागी होत आहेत. असे असले तरी सोशल मीडिया आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे.