आज 5 जून म्हणजे जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day). पृथ्वीवरील निसर्गसंपदा जपणे, संवर्धन करणे यासंबंधी जनजागृती करण्याचा आजचा दिवस. दरवर्षी पर्यावरण दिन हा खास थीमवर साजरा केला जातो. यंदाची पर्यावरण दिनाची थीम ही जौवविविधतेवर आधारित आहे. खरंतर पृथ्वीचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतु, त्यासाठी केवळ एक दिवस पुरेसा नाही. मात्र पर्यावरण दिन आपल्याला निसर्ग रक्षणाची प्रेरणा देतो हे नक्की. सध्याच्या काळात वाढलेले प्रदुषण, प्लास्टिकचा वापर अशा अनेक गोष्टींमधून निसर्ग संपदेची हानी होत आहे. त्यामुळे पर्यावरण दिनाचे विशेष महत्त्व आहे.
पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) तसंच महाराष्ट्र शासनाकडूनही शुभेच्छा देण्यात आल्या आहे. पर्यावरण संवर्धनाच्या संदेशासह या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. (World Environment Day Messages & Wishes: जागतिक पर्यावरण दिनाच्या मराठी शुभेच्छा, Greetings, Images, Whatsapp Status, Facebook च्या माध्यमातून शेअर करून व्यक्त करा निसर्गप्रेम!)
महाराष्ट्र सरकार:
पर्यावरण आणि जैवविविधता आहेत साथी,
वसुंधरेचे स्वास्थ्य राखणे आहे आपल्या हाती!#WorldEnvironmentDay #WorldEnvironmentDay2020 #environment #EnvironmentDayContest #environmentday #जागतिकपर्यावरणदिन2020 #पर्यावरण_दिवस #पर्यावरणदिन pic.twitter.com/v7tKCO14oB
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 5, 2020
शरद पवारः
संपूर्ण मानवजातीचा कोरोनाविरुद्ध अविरत लढा सध्या सुरू आहे. ही लढाई लढताना पर्यावरण आणि निसर्ग रक्षणाकडे अधिक सजगपणे,सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आता आली आहे. तरच आपण खऱ्या अर्थाने आपले भविष्य सुरक्षित व आरोग्यदायी करण्याच्या दिशेने वाटचाल करु.#WorldEnvironmentDay pic.twitter.com/Gc4fT8Unys
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 5, 2020
सुप्रिया सुळेः
माणसांची पर्यावरणविषयक जाणीवांची कक्षा रुंद व्हावी, पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी, यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होणं आवश्यक आहे. म्हणूनच आज 'जागतिक पर्यावरण दिन' साजरा करण्यात येतो. निसर्गसंपदेचे जतन करु, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी कटीबद्ध होऊ. pic.twitter.com/CyFEn8HqZk
— Supriya Sule (@supriya_sule) June 5, 2020
राजेश टोपेः
महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना,बदलत्या वातावरणीय बदलाकडे डोळे झाक करून चालणार नाही,जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाशी मैत्री, संरक्षण व संवर्धन करण्याचा संकल्प करूया व येणार्या भावी पिढीचे आयुष्य सुरक्षित बनवूया.#WorldEnvironmentDay#विश्व_पर्यावरण_दिवस pic.twitter.com/k7ItDNLOef
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 5, 2020
अनिल देशमुखः
पर्यावरणाच्या रक्षणार्थ प्रत्येकाने प्रयत्न करण्याचा संकल्प आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करूया. #पर्यावरण_दिवस #WorldEnvironmentDay2020 pic.twitter.com/vZhZGP1GXC
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 5, 2020
आज वटपौर्णिमेचा सण देखील आहे. महाराष्ट्रातील सुवासिनींसाठी महत्त्वाचा असणारा हा दिवस वडाची पूजा करु साजरा केला जातो. परंतु, वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाजवळ जावून पूजा करा. वडाच्या फांद्या तोडणे टाळा. त्यामुळे खऱ्या अर्थाने पर्यावरण दिन साजरा होईल.