Seema Haider (Photo Credit - Twitter)

MNS Opposes Seema Haider Film: सीमा हैदर प्रकरणात (Seema Haider Case) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) एन्ट्री केली आहे. हा तमाशा बंद करा, असे मनसेकडून कडक शब्दात सांगण्यात आले आहे. आमचे ऐकले नाही तर 'राडा' होणार. सीमा हैदर पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात येत असल्याची चर्चा कायम आहे. अलीकडेच सीमाला 'कराची टू नोएडा' या चित्रपटाची ऑफर आली आहे. या प्रकरणाबाबत, राज ठाकरे यांचा पक्ष मनसेने सीमा यांच्या बॉलिवूड प्रवेशाला कडाडून विरोध केला आहे. सीमाला कोणत्याही निर्मात्याने आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी दिला आहे.

'हे असले तमाशे ताबडतोब बंद करा'

अमेय खोपकर म्हणाले की, देशद्रोही चित्रपट निर्मात्यांना लाज का वाटत नाही? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा असा जाहीर इशारा देतोय, असे ते म्हणाले. ऐकलं नाही तर राडा होईल. मुंबईतील एका प्रोडक्शन हाऊसने सीमा हैदरला चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. (हे देखील वाचा: Mumbai Crime News:मीरा रोड येथील कोचिंग क्लासच्या मालकावर चाकूने वार, आरोपीचे आत्मसर्पण; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद)

सीमा आणि निर्मात्याची झाली भेट 

अमित जानी यांनी पाकिस्तानी सीमा हैदरला त्यांच्या प्रोडक्शन हाऊस 'जानी फायरफॉक्स'मध्ये काम करण्याची ऑफर दिली आहे. जानी यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत कार्यालय सुरू केले आहे. सीमा हैदर व्यतिरिक्त तो उदयपूर टेलर कन्हैया लाल खून प्रकरणावर 'ट्रेलर' नावाचा चित्रपट बनवत आहे.