Mumbai Crime News: मीरा रोड येथील कोचिंग क्लासच्या मालकावर चाकूने वार, आरोपीचे आत्मसर्पण; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai Crime News:  मीरा-भाईंदर येथील काशिमिरा परिसरात गुरुवारी दुपारी कोचिंग क्लासच्या मालकावर चाकूने वार करून 17 वर्षीय मुलाने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या गुन्ह्याचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मीरा रोडच्या पेणकरपाडा भागातील एका जनरल स्टोअरच्या बाहेर दुपारी दीडच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  राजू ठाकूर 26 असं पीडीत व्यक्तीचे नाव आहे. स्थानिकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीसांनी या घटनेचा संपुर्ण तपास केला. पीडीतेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.