मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज (17 एप्रिल) पुणे (Pune) येथे पत्रकार परिषद (Raj Thackeray Press Conference) घेत आहेत. नेहमीप्रमाणे याही पत्रकार परिषदेबद्दल मोठी उत्सुकता आहे. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी मोठे स्क्रिन लावण्यात आल्याने उत्सुकता वाढली आहे. राज ठाकरे आज पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडिओ' (Lav Re Toh Video) मूडमध्ये असल्याची चर्चा आहे. आजच्या पत्रकार परिषदेतून राज ठाकरे को णावर निशाणा साधतात याबाबत उत्सुकता आहे. राज ठाकरे यांनी कालच पुणे येथे हनुमान चालिसा पटण केले. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणखी काय विधाने करतात याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
राज ठाकरे आणि त्यांची मनसे ही भाजपची टीम सी असल्याची खिल्ली महाविकासआघाडीकडून उडविण्यात आली. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील भाजपचे ओवेसी कोण आहेत हे जनतेला कळले आहे, अशी नामोल्लेख टाळत शिवसेनेने टीका केली आहे. या सर्व टीकेला राज ठाकरे काय प्रत्युत्तर देतात याबाबतही उत्सुकता आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना मुखपत्र अशी ओळख असलेल्या सामना वृत्तपत्रातून संपादक संजय राऊत यांनी लिहिलेल्या 'रोखठोक' या साप्ताहीक लेखात 'रामाच्या नावाने तुकडे तुकडे' गँग असा उल्लेख करत जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यावरही राज ठाकरे काय बोलतात हे पाहावे लागणार आहे. (हेही वाचा, Sanjay Kakade on Raj Thackeray: राज ठाकरे यांनी विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे, मनसेशी युतीकरुन भाजपला फायदा नाही- संजय काकडे)
दरम्यान, मनसे आणि भाजप यांच्यात निर्माण होत असलेले सख्य पाहता आगामी काळात नवी युती होण्याची शक्यात व्यक्त होत आहे. दुसऱ्या बाजूला भाजपमधीलच काही लोकांना मनसेशी युती ही अनाठाई असल्याचे वाटते. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरुन घेतलेल्या भूमिकेला भाजपने पाठिंबा दिला आहे. अनेक भाजप (BJP) नेत्यांनी त्यांचे तोंडभरुन कौतुकही केले आहे. दरम्यान, पुणे भाजप उपाध्यक्ष संजय काकडे यांनी मात्र राज ठाकरे यांच्या यांना वेगळाच सल्ला दिला आहे. राज ठाकरे यांनी धर्म, जात पात यांपेक्षा थेट विकासाच्या मुद्यांवर बोलावे, असे म्हटले आहे. शिवाय मनसेशी युती करुन भाजपला विशेष असा काहीच फायदा मिळणार नाही, असेही काकडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे संजय काकडे यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे काय बोलणार याबाबत राजकीय वर्तुळातून उत्सुकता आहे.