throw coconuts and dung on Uddhav Thackeray's convoys Photo Credit TWitter

 Attack on Uddhav Thackeray's convoys: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) बीड येथील दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्या होत्या. या घटनेनंतर राजकिय वातावरण तापलं गेले. ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी ताफ्यांवर सुपाऱ्या फेकल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्त्ये आक्रमक झाले. प्रत्युत्तर देण्यासाठी शनिवारी ठाण्यात शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर नारळ आणि शेण फेकले गेले. त्यामुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. (हेही वाचा- 'राज ठाकरेंच्या वाट्याला गेलात तर घरात घुसून मारू', मनसे नेते अविनाश जाधव यांचा ठाकरे गटाला इशारा (Watch Video)

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, उध्दव ठाकरेंचा ताफा रस्त्यावरून जात असताना तरुणांच्या गटाने शेण आणि नारळ फेकले. पुरुषांचा एक गट रस्त्याच्या पलीकडे ताफा येणाची वाट पाहत उभे होते. शेण फेकल्यानंतर सर्व जण घटनास्थळावरून फरार झाले.

शेण फेकल्याचा व्हिडिओ

एएनआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली आहे. या प्रकरणातून २० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले आहे. ठाणे पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले की, सध्या या प्रकरणाची औपचारिक नोंद करण्याचे काम सुरु आहे.  दरम्यान या घटनेनंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रसार माध्यमांंना मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी राज ठाकरेंच्या वाट्याला गेला तर घरात घुसून मारू असा इशारा दिला आहे.

नेते आनंद दुबे यांची प्रतिक्रिया 

शिवसेना उध्दव ठाकरे गटातील नेते आनंद दुबे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आणि शनिवारी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.