Photo Credit- X

MNS Leader Avinash Jadhav: राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर (RajThackeray Marathwada tour)असताना त्यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या. आक्रमक मनसैनिकांनी त्याचा वचपा ठाण्यात घेतला. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर( Uddhav Thackeray) हल्ला केला. ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनांवर नारळ, शेण फेकले गेले. त्यामुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या. दरम्यान यावर मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत 'राज ठाकरेंच्या वाट्याला गेलात तर घरात घुसून मारू', असा इशारा दिला आहे.

काय म्हणाले अविनाश जाधव?

काल मराठवाडा दौऱ्यावेळी पाच सहा शिवसैनिकांनी राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वाहनांवर सुपाऱ्या फेकल्या. ठाण्यात मनसैनिकांनी त्याला उत्तर दिलं. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील 16-17 गाड्या फोडण्यात आल्या. उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण, बांगड्या फेकण्यात आल्याचे अविनाश जाधवांनी म्हटलंय. ठाण्यात जे झालं ते लाईव्ह सुरु होतं, ते सर्वांनी पाहिलंय. राज ठाकरेंच्या वाट्याला कोणी गेलं तर त्याचं जशासं तसं उत्तर देण्यात येईल, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला आहे. राज ठाकरेंच्या नादाला लागू नका. आज आम्ही गडकरी रंगायतनपर्यंत पोहोचलोय. उद्या आम्ही तुमच्या घरपर्यंतही येऊ. पुन्हा राज ठाकरेंवर बोलल्यास किंवा त्याच्या आजूबाजूला फिसल्यास घरात घुसून मारू असा इशारा अविनाश जाधवांनी ठाकरे गटाला दिला आहे. माझ्यासारखे हजारो वेडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करतात. राज ठाकरेंसोबत असं काही करण्याचा विचार जरी त्यांच्या कोणत्या कार्यकर्त्याने केला तरी त्याला घरात घुसून मारु, असे अविनाश जाधव म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रीया

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मनसेच्या राड्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला. राडा घालणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान ही अॅक्शनला रिअॅक्शन असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली.

मनसे नेते अविनाश जाधव 

सुषमा अंधारेंचं आव्हान

ठाण्यातील मनसेच्या राड्यानंतर ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसेला खुलं आव्हान दिलं. आपल्या भागात कुत्राही वाघ असतो, मात्र 'इलाका तुम्हारा और धमाका हमारा' यात खरी मजा आहे, असं खुलं आव्हान, सुषमा अंधारेंनी मनसेला दिलं. एकनाथ शिंदेंची मदत मिळू शकेल अशा सुरक्षित ठाण्यात मनसे आक्रमक झाली, अशा शब्दांत त्यांनी मनसेला डिवचलं.