Ulhasnagar: खळबळजनक! प्रियकराच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीने केली स्वत:च्या आईची हत्या; उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी येथील घटना
Crime | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

प्रियकरासाठी एका अल्पवयीन मुलीने स्वत:च्या आईची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना उल्हासनगर (Ulhasnagar) येथील विठ्ठलवाडी (Vitthalwadi) परिसरात शनिवारी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी संबंधित मुलगी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलीची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, आज मुख्य आरोपीला न्यायालयात हजर केले असता 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित तरूणीचे जीन्स कारखान्यात काम करणाऱ्या दिलजीत यादव नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. परंतु, मुलीच्या आईचा याला विरोध होता. तसेच ती दिलजीतला घरी येण्यास मज्जाव करत होती. त्यामुळे मुलीने प्रियकर दिलजीत यादवच्या मदतीने आईला संपवण्याचा निर्णय घेतला. आई घरी एकटीच असल्याने त्याने प्लॅनिंग केली. त्यानुसार दिलजीत हा मुलीच्या घरात शिरला. त्यानंतर तिच्या आईच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत तिची गळा चिरून निर्घृण हत्या केली आणि पसार झाला. हे देखील वाचा- Ahmedabad: कोरोनाची लागण झालेल्या नर्स महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार; पतीसह सासरच्या लोकांविरोधात खोखरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर 4 च्या 26 सेक्शन परिसरातील एका महिलेचा तिच्या घरातच रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशीला सुरुवात केली. यात मुलीनेच प्रियकराच्या मदतीने स्वत: आईची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.