Mhada Fraud Warning | (Photo credit: archived, edited, representative image)

मुंबई मध्ये स्वतःच्या मालकीचं घर घेण्याचं स्वप्न असणार्‍यांसाठी खूषखबर आहे. मागील 2-3 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता अखेर म्हाडाच्या कोकण मंडळाकडून (MHADA Konkan Division) घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये यंदा ठाणे, कल्याण, वसई-विरार, मीरा-भाईंदर भागामध्ये 8984 घरांसाठी ही लॉटरी जाहीर होणार असून येत्या 24 ऑगस्ट पासून त्यासाठी नागरिक अर्ज दाखल करू शकणार आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार याबाबतची म्हाडाची अधिकृत जाहिरात सोमवार 23 ऑगस्ट दिवशी प्रसिद्ध केली जाईल. पुढील महिनाभर ही प्रक्रिया सुरू राहणार असून 14 ऑक्टोबरला ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात त्याची सोडत जाहीर केली जाणार आहे. (नक्की वाचा: MHADA Lottery 2021 Update: म्हाडा चं Konkan Board यंदा दसर्‍याच्या मुहूर्तावर जाहीर करणार 9000 घरांसाठी सोडत).

दरम्यान मागील 2 वर्षांपासून म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून तर 3 वर्षांपासून कोकण मंडळाकडून कोणतीही सोडत जाहीर करण्यात आलेली नाही. या भागात अनेकांनाच आपलं स्वप्नातलं घर असावं अशी इच्छा असल्याने अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मग यंदाच्या लॉटरीमध्ये तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असेल तर या महत्त्वाच्या अपडेट्स, तारखांकडे लक्ष ठेवा. नक्की वाचा:  Mahad, Raigad Landslide: दरड कोसळून उद्धवस्त झालेलं तळीये गाव म्हाडा वसवणार; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा.

म्हाडा कोकण मंडळ घरांच्या लॉटरीचे अपडेट

घरांसाठी जाहिरात - 23 ऑगस्ट

म्हाडा घरांसाठी नोंदणी सुरू होणार - 24 ऑगस्ट (दुपारी 12 वाजल्यापासून)

म्हाडा घरांसाठी अर्जांची अंतिम मुदत - 22 सप्टेंबर (रात्री 12 वाजेपर्यंत)

अर्ज विक्री आणि स्वीकृती - 24 ऑगस्ट (3 वाजल्यापासून)

म्हाडा घरांची सोडत - 14 ऑक्टोबर

अर्ज कुठे कराल - www.mhada.gov.in

कोकण मंडळाच्या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी 6195 घरं, अल्प उत्पन्न गटासाठी 1775, मध्यम उत्पन्न गटासाठी 234 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 1 अशी एकूण 8205 घरांचा समावेश आहे. आणि 700 उरलेल्या घरांचा समावेश असणार आहे.