MHADA Konkan Board Lottery 2021: मुंबई मध्ये स्वतःच्या मालकीचं घर घेण्याची इच्छाअसणार्यांसाठी एक गूड न्यूज आहे. म्हाडा अर्थात Maharashtra Housing and Area Development Authority ने दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा कोकण विभागाकडून यंदाच्या दसर्याला 9000 घरांसाठी सोडत निघणार आहे. यामध्ये मुंबई नव्हे तर एमएमआर रीजन मध्ये वसई, विरार, कल्याण, मीरा रोड, ठाणे याचा सहभाग असणार आहे. नक्की वाचा: Mahad, Raigad Landslide: दरड कोसळून उद्धवस्त झालेलं तळीये गाव म्हाडा वसवणार; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा.
कोकण विभागीय मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ही सोडत आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्प आणि मध्यम उत्पन्न असणार्या वर्गासाठी आहे. कोकण विभागीय मंडळ तब्बल 3 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता 9 हजार घरांसाठी सोडत जाहीर करणार आहे. कोविड 19 संकटामुळे म्हाडाची ही लॉटरी लांबणीवर पडली होती. यंदाच्या वर्षी 6500 घरं ही प्रधानमंत्री आवास योजना, 2000 घरं ही मंडळाची तर 500 घरं इतर काही प्रोजेक्ट्सचा भाग म्हणून समाविष्ट करण्यात आली आहेत.
2018 मध्ये 1395 घरांसाठी 1.64 लाख अर्ज आले होते तर त्यापूर्वी 2017 मध्येही 819 घरांसाठी एक लाखापेक्षा अधिक घरांचे अर्ज आले होते. सध्या म्हाडा Pahadi Goregoan मध्ये घरांची बांधणी करत आहेत. त्यांचा लॉटरी मध्ये समावेश करून घेण्यासाठी अजून काही वर्षांचा काळ जाऊ शकतो.