Survey For Maratha Reservation | (Photo Courtesy: archived, edited, symbolic images)

Manoj Jarange Patil News: मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. ते लाखोंच्या समुदयासह आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राज्य सरकारही दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रयत्नशील असून कामालाही लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून घरोघरी जाऊन मराठा समाजाचे सर्वेक्षण (Maratha Reservation Survey) केले जात आहे. नोंदी घेतल्या जात आहे. मुंबई महापालिका प्रशासनही या कामी सक्रीय आहे. बीएमसी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत बीएमसी हद्दीतील सुमारे 2,65,000 घरांना भेटी देऊन सर्व्हे (BMC Maratha Survey) करण्यात आला आहे. त्याद्वारे मराठा समाज संख्या मोजण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सॉफ्टवेअर आणि अॅपमध्ये असलेल्या तांत्रिक समस्यांचा सामना करत हा सर्वे करताना कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगोदरच स्पष्ट केले आहे की, पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आणि मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मराठा समाजाच्या सामाजिक मागासलेपणाचे मूल्यांकन करण्यासाठी गोळा केलेल्या प्रायोगिक डेटाचे विश्लेषण करतील.

सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य

विशेष म्हणजे सॉफ्टवेअर आणि अॅप यामधील तांत्रिक अडचणी इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत की, पहिल्या दिवशीही या सॉफ्टवेअरवर क्षमता असूनही मोठ्या प्रमाणावर नोंदी करता आल्या नाहीत. मरठा आरक्षण देण्याच्या दृष्टीने सरकार हालचाली करत आहे. त्यासाठी  हा सर्वे येत्या 31 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. विवित मुदतीत हा सर्वे पूर्ण करण्यासाठी अॅप आणि सॉफ्टवेअरची मोठ्या प्रमाणावर मदत घेतली जाणार आहे. शहरातील मराठा आणि बिगरमराठा समाजातील जवळपास 38 लाख कुटुंबाशी संवाद साधला जाणार आहे. अशाच पद्धतीचे सर्वेक्षन सुरु आहे. त्याद्वारे जवळपास 2.5 कोटी रुपयांचा अभ्यास केला जाणार आहे. ज्यामध्ये मराठा आणि बिगरमराठा समूदाय आहे. (हेही वाचा, Maratha Aarakshan Protest: मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त लोणावळ्यात, मनोज जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू)

सर्वेक्षणात तांत्रिक अडचणींमुळे समस्या

सर्वेक्षणातून पुढे येत असलेला डेटा संकलन करण्यासाठी वापरले जाणारे अॅप आणि सॉफ्टवेअर यांवर लॉग इन करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहेत. तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने हा सर्वे करणाऱ्या प्रतिनिधींना नाहक मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. बीएमसी अधिकाऱ्याने टीओआयशी बोलताना सांगितले की, सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम सुरू करण्यापूर्वी अॅपवर लॉग इन करताना OTP प्राप्त करावा लागतो. तो ओटीपी टाकला की मग हे अॅप उघण्याची प्रक्रिया सुरु होते. मात्र, नेटवर्कमध्ये समस्या असतील तर ओटीपी येत नाही आणि अॅप सुरु केले जात नाही. काही प्रकरणांमध्ये, डेटा प्रविष्ट करताना कर्मचाऱ्यांना समस्या येत होत्या. (हेही वाचा, Maratha Aarakshan Protest: मनोज जरांगे आज नवी मुंबई मध्ये दाखल होणार; वाहनधारकांना पुणे एक्सप्रेस वे सह शहरातील 'हे' मार्ग टाळण्याचे आवाहन .)

डेटा कोणाशीही सामायिक केला जाणार नाही- बीएमसी

दरम्यान, अतिरिक्त BMC आयुक्त सुधाकर शिंदे यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, विविहित वेळेतच हे सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे. त्यामुळे सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेही वेळ अत्यंत मर्यादित आहे. सॉफ्टवेअरमधील सुरुवातीच्या अडचणी दूर केल्या जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले. बीएमसी कर्मचार्‍यांसह सामायिक केल्या जाणार्‍या डेटाच्या गोपनीयतेबद्दलच्या शंका दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते म्हणाले उपलब्ध झालेला डेटा इतर एजन्सींशी सामायिक केला जाणार नाही.

सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्यासाठी बीएमसीने सुमारे 30,000 कर्मचारी तैनात केले आहेत. प्रत्येकाला एकूण 150 घरांचे लक्ष्य देण्यात आले आहे. दररोज सुमारे 4-5 लाख कुटुंबांना कव्हर करण्याचा बीएमसीचा मानस आहे. राज्यभरात सर्वेक्षण करणाऱ्यांची संख्या 1.25 लाखांहून अधिक आहे. सर्वेसाठीची प्रश्नावली गोखले इन्स्टिट्यूटने तयार केली आहे. जर घर मराठा समाजातील असेल तर त्यांना सुमारे 160 प्रश्न विचारले जातील, असे बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितले.