Rain | Image used for representational purpose | (Photo Credits: @NarimanPatel/ Twitter)

Untimely Rain In Maharashtra: हवामान खात्याच्या (Weather Department)  अंदाजानुसार, आज रविवार, 10 मे रोजी संध्याकाळी ४ नंतर पुढील काही तास महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. यामध्ये अमरावती (Amravati) , वर्धा (Wardha) , बुलढाणा (Buldhana) , नागपूर (Nagpur) , भंडारा (Bhandara) या जिल्ह्यात वारे आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यातील सुद्धा मोजक्याच भागात पाऊस होईल मात्र हा पाऊस सलग तीन तास इतका वेळ राहू शकतो. असा हवाम खात्याचा अंदाज आहे. प्राप्त माहितीनुसार, पुढील तीन तास वाऱ्याचा वेग हा प्रति तशी 30 ते 40 किमी इतका असेल, यामुळे अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. या भागातील नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही मात्र खबरदारी बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी माहिती केंद्राच्या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आले आहे.

मागील काही दिवसात पुणे, रत्नागिरी, तळकोकण तसेच बुलढाणा, पश्चिम महाराष्ट्र या भागात अवकाळी पाऊस झाला होता, या पावसामुळे शेती, आणि घरांचे मोठे नुकसान झाले होते. पुण्यात तर अनेक घरांची छप्परे उडून गेल्याचे, मोबाईलचा टॉवर कोसळल्याचे, झाडे मोडून पडल्याचे प्रसंगही घडले, सुदैवाने या पावसात जीवितहानी झालेली नाही. #Video: पावसाळा तोंडावर असतानाही मुंबईतील मिठी नदी, धारावी भागातील नाल्यांची परिस्थिती दयनीय

पहा ट्विट

दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या मान्सून हंगामात भारतामध्ये सरासरीच्या 100% पाऊस पडणार आहे. केरळ मध्ये 1 जून पर्यंत पावसाळा सुरु होईल तर मुंबईत 11 जून ते 15 जून च्या दरम्यान पाऊस धडक देईल अशी शक्यता आहे.