Monsoon 2020| Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

Monsoon 2020 Updates: संपूर्ण भारत देश आज कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमध्ये असताना भारतीय हवामान विभागाने (IMD)  शेतकर्‍यांना खूषखबर दिली आहे. आज जारी करण्यात आलेल्या अंदाजानुसार, येत्या मान्सून हंगामात भारतामध्ये सरासरीच्या 100% पाऊस पडणार आहे. भारतामध्ये जून ते सप्टेंबर हा मान्सूनचा काळ आहे. या काळात भारतात अंदाजे 70% पाऊस होतो. यंदा या सरासरीच्या 96 ते 100% पाऊस बरसणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजात देण्यात आली आहे. भारत हा कृषीप्रधान देश असल्याने भारताची अर्थव्यवस्था भक्कम करणार्‍या शेतकर्‍यांसाठी मान्सून अंदाज हा अत्यंत महत्त्वाचा आहे.

आज IMD कडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, यंदा केरळ मध्ये मान्सून 1 जून किंवा त्यापूर्वी दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच इतर ग्लोबल क्लायामेट मॉडेल्सच्या निर्देशानुसार, मान्सून सीझनच्या दुसर्‍या टप्प्यात पॅसिफिक ओशनवर सौम्य स्वरूपात La Nina चा परिणाम दिसू शकतो. सागरी भागावरील तापमानाचा भारतात बरसणार्‍या पावसावर मोठा परिणाम असतो. त्यामुळे IMD वेळोवेळी पॅसिफिक आणि इंडियन ओशनवर sea surface conditions मध्ये होत असलेल्या बदलांवर लक्ष ठेवून असेल असेदेखील सांगण्यात आलं आहे.

ANI Tweet 

भारतामध्ये भात, गहु, ऊस आणि तेलबिया घेणार्‍या शेतकर्‍यासाठी मान्सून हा अत्यंत महत्त्वाचा आहे. यावर देशाची सुमारे 15% अर्थव्यवस्थादेखील अवलंबून आहे. IMD कडून हवामानाचा सुधारित अंदाज मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. यासोबतच जून त्व ऑगस्ट महिन्यात दर महिन्याला पावासाचा अंदाज आणि जून ते सप्टेंबर महिन्याचा एकूण सीझनचा पावसाचा अंदाज जाहीर केला जाणार आहे. यामध्ये भारताच्या चारही भौगोलिक भागांचा समावेश असेल.