Weather Forecast Today

राज्यात थंडी कायम असली तरी त्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊन तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मुंबई आणि कोकण यांचा अपवाद वगळता उर्वरीत महाराष्ट्राचे तापमान (Maharashtra Weather Update) सरासरीपेक्षा 1 ते 4 डिग्री से. ग्रेडने अधिक पाहायला मिळत आहे. परिणामी राज्यात थंडी जाणवत आहे. पण त्याची तीव्रता अधिक आहे. दुसऱ्या बाजूला मुंबई आणि कोकणामध्ये महाराष्ट्रातील इतर विभागांच्या तुलनेत तापमान सरासरी 1 ते 2 डिग्री सेल्सीयस ग्रेडणे घसरल्याचे पाहायला मिळते आहे. साजिकच इतर भागांच्या तुलनेत इथे काहीशी अधिक थंडी आहे.

बंगालच्या उपसारगरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, पश्चिम बंगालच्या उपसारगात हवेच्या कमी दाबाबचा पट्टा निर्माण झाला आहे. जो पुढे सरकतो आहे. परिणाी पूर्व इशान्येकडे दाब वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस संभवतो. महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव आणि परिणाम पाहायला मिळेल. येत्या 24 आणि 25 डिसेंबर 2024 ला विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. दरम्यान, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हवेत आर्द्रता वाढल्याचे पाहायला मिळेल. त्यामुळे या परिसरात हवामान ढगाळ असण्याचा संभव अधिक आहे. त्यामुळे किमान तापमनही वाढल्याचे पाहायला मिळेल.

नाताळ सणाला थंडीचा कडाका

दरम्यान, 25 डिसेंबर रोजी आलेल्या नाताळ सणाचा प्रभाव असलेले पुढचे चार ते पाच दिवस (बुधवार ते रविवार) महाराष्ट्राच्या हवामानात मोठ्या घडामोडी पाहायला मिळतील. काही भागात तापमान वाढलेले तर काही ठिकाणी लक्षणीयरित्या घटलेले पाहायला मिळेल. खास करुन हा बदल 26 ते 28 डिसेंबरच्या कालावधीत पाहायला मिळेल. या तीन दिवसांमध्ये पावसाची शक्यताही अधिक असल्याचे पाहायला मिळू शकेल.

बदलत्या हवामानाचा गहू, हरबरा यांसारख्या पिकाला अल्पसा लाभ पाहायला मिळू शकत. पण दुसऱ्या बाजूला द्राक्षे, कांदा, मिरची यांसारख्या पिकांना फटका बसू शकतो. वातावरण काहीसे ढगाळ झाल्याने नाताळ सणादरम्यान थंडीचे प्रमाण कमी असेल असे मानले जात होते. मात्र, वातावरणातील बदल पाहता थंडी अनुभवायला मिळू शकते.