Maharashtra Unlock: महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यातील अनेक निर्बंधांना शिथिलता देण्यात आली आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मुंबई लोकल, हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल आणि दुकानांबाबत महत्वाची घोषणा केली होती. दरम्यान, कोरोना प्रतिबंध लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच हॉटेल रेस्टॉरंट आणि दुकानदारांना मोठा दिलासा देण्यात आला होता. त्यानुसार, राज्यात आजपासून हॉटेल, दुकाने, मॉल आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. यामुळे व्यापारी कोरोनाच्या दीर्घकाळ र्निबधांनंतर राज्यातील व्यावसायिकांना आजपासून व्यवसायाचे स्वातंत्र्य मिळणार आहे.
महाराष्ट्रात आलेल्या आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन घोषीत करण्यात आले. ज्यामुळे सर्वसामन्यांनाही मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची बंदी घालण्यात आली होती. तर, राज्यातील दुकाने, मॉल आणि उपहारगृह निर्बंधाखाली सुरु होते. ज्यामुळे व्यवसायिकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावा लागत होते. तर, मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची मुभा नसल्याने सर्वसामन्यांना प्रवास करताना अनेक अडचणींना येत होत्या. हे देखील वाचा- Maharashtra Colleges Reopen: राज्यातील महाविद्यालयं लवकरच सुरू होणार- उदय सामंत
मुंबई लोकल-
ज्या प्रवाशांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले आणि लसीचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाले. त्यांना आजपासून मुंबई महानगर प्रदेशातील स्थानिक गाड्यांद्वारे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दुकाने, उपाहारगृहे आणि मॉल-
दुकाने, उपाहारगृहे, मॉल यांना रात्री रात्री दहावाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. दुकाने, उपाहारगृहे, मॉलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होऊन 14 दिवस पूर्ण होणे बंधनकारक असेल. उपाहारगृहे आणि बार आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. पार्सलसेवा 24 तास सुरू राहील. दरम्यान, मास्क लावणे बंधनकारक राहील. मॉलमध्ये प्रवेश करताना ग्राहकांना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
विवाह सोहळा-
खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी 200 जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळ्यांसाठी आसन क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेने परवानगी देण्यात आली आहे.
खासगी आस्थापना-
खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असेल तर, 100 टक्के उपस्थितीने काम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी कार्यालयांना 24 तास चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, एका सत्रात 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीला परवानगी असणार आहे.
महत्वाचे म्हणजे, राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता मर्यादित आहे. दररोज केवळ 1300 मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन केले जाते. परंतु, राज्यात यापुढे प्रतिदिन 700 टन मेट्रीक ऑक्सिजनची गरज भासू लागल्यास पुन्हा कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल, असाही इशारा राज्य सरकारकडून देण्यात आला आहे.
महत्वाचे म्हणजे, दुकाने, उपाहारगृहे, मॉलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होऊन 14 दिवस पूर्ण होणे बंधनकारक असेल. उपाहारगृहे आणि बार आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. पार्सलसेवा 24 तास सुरू राहील. दरम्यान, मास्क लावणे बंधनकारक राहील. मॉलमध्ये प्रवेश करताना ग्राहकांना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.