Training Aircraft Crashed: जळगावमध्ये ट्रेनिंग चार्टर विमान कोसळले; प्रशिक्षकचा मृत्यू, शिकाऊ महिला वैमानिक जखमी
Training charter plane crashes in Jalgaon (Photo Credit: ANI)

ट्रेनिंग चार्टर विमान कोसळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील वर्डी गावाजवळ दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत प्रशिक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर, ट्रेनी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, ही दुर्घटना घडल्यानंतर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी तपास पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना केल्याची माहिती ट्वीट करून दिली आहे. हे चार्टर विमान कुठे जात होते? त्याचा अपघात कशामुळे झाला? याची अद्याप माहिती पोलिंसाना उपलब्ध झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षक नसरूद अनिम (वय, 30) यांचा मृत्यू झाला आहे. तर, शिकाऊ महिला वैमानिक अंशिका गुजर (वय, 21) असे जखमी झालेल्या शिकाऊ महिला वैमानिकांचे नाव आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी त्यावर शोक व्यक्त केला आहे. हे देखील वाचा- Pune Fire: इंडियन इंस्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅन्ड रिसर्ज मध्ये आग, अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल

ट्वीट-

या घटनेनंतर जळगावचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटले आहे की, अपघातग्रस्त विमान हे शिरपूर येथून उड्डाण केली आहे. त्यानंतर काही वेळातच वर्डी शिवारात कोसळले. तांत्रिक कारणांमुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघात प्रशिक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, जखमी शिकाऊ महिला वैमानिकास मुंबई येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.