Maharashtra Shocker: जालना मध्ये स्त्रीरोगतज्ञाचा निष्काळजीपणा नवमातेच्या जीवावर बेतला; प्रसुतीनंतर रूग्णाला अति रक्तस्त्राव  होत असताना डॉक्टर मॉर्निंग वॉक वर!
Doctors | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

जालना (Jalna) मध्ये एका खाजगी रूग्णालयामध्ये एका स्त्रीरोग तज्ञाच्या (Gynaecologist) निष्काळजीपणामुळे 26 वर्षीय महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी सरकारी समितीने महिला डॉक्टरला दोषी ठरवल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर पूर्व अनुभव नसलेल्या नर्सच्या जीवावर महिला रूग्णाला सोडून स्वतः मॉर्निंग वॉकला गेली. Government Hospital and Medical College (GHMC) Aurangabad च्या वरिष्ठ डॉक्टरांच्या अहवालानुसार, स्त्रीरोगतज्ञ दोषी असल्याचं समोर आल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत रूग्णाचं नाव Neha Lidhoriya आहे. त्यांच्या मृत्यू प्रसुती पश्चात अति प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने झाला आहे. वैद्यकीय भाषेत यालाच postpartum haemorrhage म्हणतात. 13 एप्रिल 2022 ला नेहा प्रसुतीसाठी दाखल झाली होती. तिने बाळाला जन्म दिला मात्र नंतर अति प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तेव्हा डॉक्टर मॉर्निंग वॉक साठी निघून गेल्या होत्या. त्यांनी नेहाला एका अनुभव नसलेल्या नर्सच्या जीवावर सोडलं होतं. नर्स किंवा डॉक्टर यांनी रक्ताची आवश्यकता असल्याची कोणतीच माहिती दिली नव्हती. हे देखील नक्की वाचा: Nagpur: अल्ट्रासाऊंड क्लिनिकला वैद्यकीय निष्काळजीपणा पडला महागात; मुलाच्या पालकांना 1.2 कोटी रुपये भरपाई देण्याचे NCDRC चे आदेश .

पत्नीच्या मृत्यू पश्चात पतीने सरकारी जिल्हा रूग्णालयामध्ये नेहाच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केली. त्यानंतर हे प्रकरण GMCH च्या पॅनलकडे वर्ग करण्यात आले. स्त्रीरोगतज्ञावर कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.