मुसळधार पवासामुळे (Maharashtra Rains Updates) राज्यात विविध जिल्ह्याध्ये मोठे अपघात घडले आहेत. प्रामुख्याने रायगड (Raigad District) आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई येथे दरड कोसळून (Raigad Landslide) झालेल्या अपघातात 32 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. रायगडमध्ये आतापर्यंत पावसामुळे 36 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. 42 जण अद्याप बेपत्ता आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यातही पाटण तालुक्यात दरड कोसळून (Satara Landslides) दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे. या दुर्गटनेत चार घरं ढिगाऱ्याखाली दबली असून, 14 जणांचा शोध सुरु असल्याची माहिती आहे. साताऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत 8 जण ठार झाल्याची माहिती आहे. 27 जणांना सुखरुप वाचविण्यात यश आले आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळई येथी दुर्घटना अतिषय भीषण आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथला निर्माण झाला आहे. परिणामी एनडीआरएफची टीम आणि प्रशासन मदत घेऊन घटनास्थळी पोहोचण्यास बराच विलंब लागत आहे. त्यातच मुसळधार पाऊस सुरु झाला की पुन्हा मदत आणि बचाव कार्यास अडथळा येत आहे. त्यातच अंधार पडला की बचाव आणि मदतकार्य पूर्ण क्षमतेने करता येत नाही. त्यामुळे दिवस मावळण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य राबवून लोकांचे प्राण वाचवणे आणि त्यांना सुरक्षीत ठिकाणी पोहोचविणे आवश्यक आहे. (हेही वाचा, Konkan Flood Updates: प्रविण दरेकर, गिरीश महाजन माणगाव येथे अडकले; जीव मुठीत घेऊन नागरिक बसच्या टपावर)
एएनआय ट्विट
A total of 36 people died in the district due to landslides, 32 of them died in Talai and 4 in Sakhar Sutar Wadi. 30 people trapped: Nidhi Chaudhary, District Collector, Raigad#Maharashtra
— ANI (@ANI) July 23, 2021
एएनआय ट्विट
#WATCH Incessant rains damage roads in Mahad of Raigad district in Maharashtra
A total of 36 people have died in the district due to landslides pic.twitter.com/kebygVcPjt
— ANI (@ANI) July 23, 2021
दरम्यान, महाड येथील तळई येथील गावात ज्या ठिकाणी दरड कोसळली त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, पालकमंत्री आदिती तटकरे आणि आमदार भरत गोगावले घटनास्थळी दाखल झाले आहेत. या सर्वांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच, मदत आणि बचाव कार्याचा आढावाही घेतला.
एएनआय ट्विट
Maharashtra | 8 people dead, 2 missing and 27 safely rescued in Satara district due to rains, says the Collector
— ANI (@ANI) July 23, 2021
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मोरणा भआगात असलेल्या आंबेघर येथे दरड कोसळली. आंबेघर येथे अनेक घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. घरांचा आणि त्यात अडकलेल्यांचा आकडा समजू शकला नाही. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. काही ठिकाणी पुलांवरुन पाणी वाहते आहे. त्यामुळे मदत आणि बचावकार्य करणाऱ्या प्रशासन आणि एनडीआरएफच्या दलालाही घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होत आहे. त्यामुळेही मदत आणि बचावकार्यास विलंब होत आहे.