MNS Appeal To CM Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनसचे अवाहन, 'अन्यथा लोकांचा
Bala Nandgaonka,CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचे संकट कायम असतानाच परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी ( Maharashtra Rains Update) होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास वाया गेला आहे. अशा स्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे डिजिटल पद्धतीचा वापर करत राज्यात उद्भवलेल्या परिस्थीतीचा आढावा घेत आहेत. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्याशिवाय त्यांच्या अडचणी कळणार नाही. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत केली नाही तर ' लोकांचा "ठाकरे"नावावरील विश्वास उडेल' असे मनसेने म्हटले आहे. मनसे (MNS) नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे.

बाळा नांदगावकर यांनी ट्वटमध्ये म्हटले आहे की, 'मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल "online" बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा "ठाकरे"नावावरील विश्वास उडेल.' (हेही वाचा, Amazon, Flipkart App मध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची मागणी नाहीतर दिवाळीचा सण MNS स्टाइलने साजरा केला जाण्याचा इशारा)

दरम्यान, नांदगावकर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका वृत्तवाहिनेने दाखवलेल्या वृत्ताचा आहे. या व्हिडिओत दिसते की, एक शेतकरी पावसामुळे झालेल्या नुकसान पाहून दु:ख व्यक्त करत आहे. या शेतकऱ्याचे सगळे पीक पाण्यात गेले आहे. शेतात तुडूंब पाणी भरले आहे. झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदील झाला असून, तो शेतातील चिखलात लोळताना दिसत आहे.

दरम्यान, परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण अशा विविध ठिकाणी जोदार हजेरी लावली आहे. अचानक कोसळेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान तर झाले आहेच. परंतू, शहरांमध्येही अनेक ठिकाणी इमारतीच्या भींती कोसळणने. दुकांने, घरे, कार्यालयांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.