Monsoon (Photo Credit: PTI/Representational Image)

राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे. पुढील 5 दिवस राज्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा IMD चा अंदाज आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra), कोकणातही (Kokan) जोरदार पावसाचा अंदाज आहे. 24-25 तारखेला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने राज्यभरात पुन्हा पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून  मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात पावसाचा जोर वाढणार आहे. तर पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

K S Hosalikar Tweet:

पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर पुढील सलग तीन दिवस पुण्यात वेगवान वाऱ्याच्या साथीने विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. राज्यभरात पावसाचा अंदाज असला तरी मुंबईत पावसाचा जोरदार पावसाची शक्यता नाही. परंतु, काही ठिकाणी हलक्या सरी बरसू शकतात. (Maharashtra Rain Forecast: जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना मिळाला Yellow Alert)

दरम्यान, 1 जूनपासून पाऊस सुरु झाल्यानंतर प्रथमच राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी व सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला दिसत असल्याचे चित्र आहे, अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.