Maharashtra Political Crisis: राज्यापालांच्या आदेशाला शिवसेनेचे आव्हान, सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर आज सायंकाळी 5 वाजता सुनावणी
Supreme Court (Photo Credit - Twitter)

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशविरुद्ध शिवसेनेने न्यायालयात आव्हान दिले आहे. शिवसेना प्रदोत सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आजच (29 जून) सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) मान्यता दिली आहे. आज सायंकाळी पाच वाजता या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सुनावणीसाठी आपण सर्व कागदपत्रे घेऊन न्यायालयात या असे आदेश सर्वोच्च न्यायलायने याचिकाकर्त्यांना दिले आहेत.

न्यायालयात काय घडले?

शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी न्यायालयात बाजू मांडली. अभिषेक मनू सिंघवी यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना न्यायालयाला विनंतीवजा बाजू मांडत म्हटले की, न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने आजच सुनावणी घ्यावी, कारण उद्या (24 तासात) बहुमत चाचणी आहे आणि याबाबत आजच आम्हाला माहिती देण्यात आली आहे. सिंघवी यांच्या युक्तीवादावर न्यायमूर्तींनी विचारले की, तुम्ही जी माहिती सांगत आहात त्यासंबंधीची कागदपत्रे तुम्ही उपलब्ध लवकर करणार का? यावर सिंघवी यांनी म्हटले की, आपण आम्हाला थोडा जरी वेळ दिला तरी आम्ही सर्व कागदपत्रे आपल्यासोर सादर करण्यास तयार आहोत. सिंघवी यांना विरोध करताना विधिज्ञ कौल यांनी म्हटले की, कौल म्हणाले की, बहुमताच्या चाचणीसाठी अधिवेशन बोलावणं हा राज्यपालांचा अधिकार आहे. तो तुम्ही मान्य केला पाहिजे. (हेही वाचा, Maharashtra Political Crisis: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात)

दरम्यान, न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, ठिक आहे. आपण दुपारी 3 वाजेपर्यंत आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवा. या प्रकरणावर आजच सायंकाळी 5 वाजता सुनावणी घेतली जाईल.

शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू सकाळी 10.30 वाजता न्यायालयात याचिका दाखल केली.. सर्वोच्च न्यायालयाच्या व्हेकेशन बेंचसमोर ही याचिका दाखल सादर झाली. न्यायालय आता सायंकाळी पाच वाजता सुनावणी घेणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.