Anand Teltumbde (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्रातील भीमा कोरोगाव प्रकरणातील (Bhima Koregaon Case) आरोपी आनंद तेलतुंबडे (Anand Teltumbde) याने NIA यांच्यासमोर 14 एप्रिल रोजी आत्मसमर्पण केले. सुप्रीम कोर्टाने गेल्याच महिन्यात आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलाखा यांच्या द्वारे दाखल करण्यात आलेला अंतरिम जामिन फेटाळून लावला होता. या दोघांवर माओवाद्यांसोबत संबंध असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यानंतर आता पुन्हा NIA कोर्टाने आनंद तेलतुंबडे याचा अंतरिम जामीन फेटाळून लावला आहे. तसेच कोर्टाने 8 मे पर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कोरोनाचा धोका असल्याचे सांगत तेलतुंबडे याने जामीन मंजून करावा अशी मागणी अर्जाद्वारे केली होती. मात्र NIA कोर्टाने त्याला हा जामीन फेटाळून लावला आहे. तेलतुंबडे याला आता तळोजा कारागृहात ठेवण्यात येणार आहे. तसेच प्रकृतीसंदर्भात वैद्यकिय तपासणी करुन येत्या रविवार पर्यंत अहवाल सादर करण्यााचे निर्देशन कारागृहाच्या प्रशासनाला दिले आहेत.(Bhima Koregaon Case: आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा यांचे NIA समोर आत्मसमर्पण; सर्वोच्च न्यायालयाने दिला होता आदेश)

 Tweet: 

जानेवारी 2018 मध्ये महाराष्ट्रात भीमा-कोरेगाव प्रकरण समोर आले होते. त्यावेळी पोलिसांकडून बहुतांश जणांना ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, कोर्टाकडून आनंद तेलतुंबडे याला अटकेसंदर्भात दिलासा मिळाला होता. पोलिसांनी तेलतुंबडे याच्या विरोधात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत जेव्हा आनंद तेलतुंबडे याने NIA यांच्यासमोर आत्मसर्पण केले असता त्यावेळी प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर हे तेलतुंबडे याचे नातेवाईक आहेत.

आत्मसमर्पण करण्यापूर्वी तेलतुंबडे याने एक चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये सरकारवर निशाणा साधत असे म्हटले होते की, देशात अशाप्रकारची घटना कोणतासोबत सुद्धा होऊ शकते. तसेच काही सामान्यांना कायद्याखाली आणत त्यांना लक्ष्य केले जात असल्याचे ही म्हटले होते. त्याने मी NIA समोर आत्मसमर्पण करत असून पुन्हा कधी परतणार हे माहिती नसल्याचे ही स्पष्ट केले होते.

दरम्यान, 1 जानेवारी 2018 मध्ये महाराष्ट्रातील पुण्यात भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडेसह अन्य काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर यांचा संबंध माओवाद्यांसोबत असल्याचा आरोप लावण्यात आला होता. पोलिसांनी असे ही म्हटले होते की, 31 डिसेंबरला यल्गार परिषदेने चिथावणीखोर भाषण दिल्यानंतर परिस्थिती अधिकच बिघडली होती.