Maharashtra MLC Election 2020 Results: शिक्षक व पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी, भाजपाला धक्का; पहा विजयी उमेदवारांची यादी
Maha Vikas Aghadi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांवरील निवडणूकीचे निकाल आता हाती येण्यास सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा असा चुरशीच्या झालेल्या लढाईमध्ये महाविकास आघाडीने सरशी मारली आहे. 5 पैकी 4 जागांवर शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी ठरले आहेत. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ साठी ही निवडणूक झाली आहे. त्यापैकी काही ठिकाणी मतमोजणी पूर्ण झाली असून काही अद्यापही मतमोजणी सुरू असून निकाल लावण्याचं काम सुरू आहे. दरम्यान औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण (Satish Chavan)  आणि पुणे पदवीधर मतदारसंघातून माहाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड (Arun Lad) विजयी झाले आहे. तर महाविकास आघाडीचे पुणे शिक्षक मतदारसंघात जयंत आसगावकर आघाडी होते नंतर विजयी ठरले आहेत. पुण्यामध्ये ही लढाई प्रतिष्ठेची मानली जात होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या मतदारसंघातून दोनदा निवडून गेले होते. Dhule Nandurbar Vidhan Parishad Bypoll: भाजप च्या अमरीश पटेल यांचा दणदणीत विजयी.

महाराष्ट्र विधान परिषद निकाल 

पुणे पदवीधर मतदारसंघ - अरूण लाड  ( राष्ट्रवादी कॉंग्रेस)

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ - सतीश चव्हाण (एनसीपी)

धुळे - नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था - अमरीश पटेल (भाजपा)

पुणे विभाग शिक्षक मतदार संघ - जयंत आसगावकर (कॉंग्रेस)

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ -  ॲड. अभिजित वंजारी (कॉंग्रेस)

नागपूर हा देखील भाजपाचा गड मानला जातो. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांचा या भागामध्ये असलेला आपला करिष्मा निवडणूकीमध्ये यश मिळवण्यात कामी आलेला नाही. पुणे पदवीधर मतदार संघातील भाजपाचे उमेदवार संदीप जोशी पिछाडीवर आहेत. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत 60747 चा कोटा पूर्ण करण्यासाठी अभिजित वंजारी यांना 4 हजार मतांची गरज होती. त्यांंनी तो टप्पा पूर्ण केला आहे. मतमोजणीची प्रक्रिया दुपारपर्यंत चालण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मागील 5 दशकामध्ये पहिल्यांदाच भाजपा पराभवाच्या छायेत आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष किरण सरनाईक आघाडीवर आहेत. विद्यमान आमदार महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे पिछाडीवर आहेत. Maharashtra MLC Election Result: शिक्षक व पदवीधर मतदार संघ निवडणूकीच्या निकालावर शरद पवार, चंद्रकांत पाटील ते अनिल देशमुख यांची पहा प्रतिक्रिया काय.

महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेमध्ये एकूण 78 सदस्य आहेत. यामध्ये 31 सदस्य विधानसभेतील आमदार निवडून देतात. 21 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात. तर 12 जणांची नेमणूक राज्यपालांकडून होते. उर्वरित 7 उमेदवार शिक्षक मतदारसंघातून तर 7 पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात.