अमरीश पटेल । Photo Credits: Twitter

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद (Dhule Nandurbar Vidhan Parishad Bypoll) जागेवर भाजपाच्या (BJP)  अमरीश पटेल (Amrish Patel) यांनी विजय नोंदवला आहे. त्यांनी सप्टेंबर 2020 मध्ये कॉंग्रेसला अलविदा म्हणत भाजपामध्ये पक्ष प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणूकीमध्ये पुन्हा आपला गड राखला आहे. अमरिश पटेल यांच्या विरूद्ध कॉंग्रेसच्या अभिजित पाटील यांचं आव्हान होतं. मात्र या निवडणूकीमध्ये अमरिश पटेल यांना 332 तर अभिजित पाटील यांना अवघी 98 मतं मिळाली आहे. यामध्ये 4 मतं अवैध ठरली आहेत. Maharashtra MLC Elections 2020 Results: पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतमोजणीला सुरूवात.

434 मतांपैकी 430 वैध मतं होती. त्यामध्ये प्रथम प्राधान्याची 216 मतं ज्यांना मिळतील ते विजयी असा नियम असतो. पण अमरीश पटेल यांनी 332 इतकी मतं मिळवत विजयी ठरली आहेत. आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अमरिश पटेल यांचे अभिनंदन केले आहे.

मुरलीधर मोहोळ ट्वीट

धुळे नंदुरबार विधान परिषद मतदार संघामध्ये भाजपाचे 199, कॉंग्रेसचे 157, राष्ट्रवादी कॉंग्रेस 36, शिवसेना 20, एमआयएम 9, समाजवादी पक्ष 7 तर बसपा, मनसे 1 आणि 10 अपक्ष सदस्य मतदार होते. दरम्यान 437 पैकी 434 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता.