Maharashtra MLC Election 2020 Results: पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतमोजणीला सुरूवात
Election Result Photo Credits: twitter/InfoDivPune

Maharashtra MLC Election Results 2020:  महाराष्ट्रामध्ये विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी (Teacher and Graduate Constituency Election 2020) तसेच धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झाले आहे. या मतदानाची आता मतमोजणी सुरू आहे. आज दुपार पर्यंत कल आणि नंतर निकाल स्पष्ट होणार आहेत. महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ साठी ही निवडणूक झाली आहे. दरम्यान वर्षभरापूर्वी राज्यात शिवसेना, एनसीपी आणि कॉंग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे या आघाडीनंतर पहिल्यांदाच ही निवडणूक होत असल्याने मतदार या आघाडीला किती पसंती देतात हे पाहणं उत्सुकतेचं झाले आहे. या निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा अशी थेट रंगत पहायला मिळणार आहे.

दरम्यान पुणे, औरंगाबाद येथे विधान परिषदेची ही शिक्षक, पदवीधर संघातील निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. कॉंग्रेस, एनसीपी सोबतच भाजपा कडून देखील सर्व ताकदीनिशी या निवडणूकीमध्ये प्रचार करण्यात आला आहे. महाविकास आघाडी पहिल्यांड एकत्र निवडणूकीला सामोरं जात असल्याने अनेकजण याकडे लिटमस टेस्ट म्हणून पाहत आहेत.

औरंगाबाद पदवीधर संघात यंदा विक्रमी 61.08 टक्के मतदान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण पुन्हा हॅटट्रिक साधणार का? अशी उत्सुकता आहे. तर पुण्यातही पदवीधर मतदार संघ आतापर्यंत भाजपाकडे होता तो ते कसा रखतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पुण्यात मनसेच्या रूपाली पाटील देखील निवडणूकीच्या रिंगणात आहेत. Maharashtra MLC Election 2020: महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी सर्व पक्षांतील उमेदवारांची नावे जाहीर, येथे पाहा पूर्ण यादी.

महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेमध्ये एकूण 78 सदस्य आहेत. यामध्ये 31 सदस्य विधानसभेतील आमदार निवडून देतात. 21 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात. तर 12 जणांची नेमणूक राज्यपालांकडून होते. उर्वरित 7 उमेदवार शिक्षक मतदारसंघातून तर 7 पदवीधर मतदारसंघातून निवडून येतात.