Maharashtra MLC Election 2020: विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी नवे चेहरे की जुन्यांनाच संधी? राज्यभाल भगत सिंह कोश्यारी यांची भूमिका महत्त्वाची
Maharashtra Legislative Council elections 2020 | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra MLC election 2020: विधान परिषदेच्या रिक्त 10 जागांसाठी लवकरच निवडणूक होत आहे. विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी नुकतीच निवडूक पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाज पक्षाचे असे एकूण 9 सदस्य बिनविरोध निवडूण गेले. त्यावेळी राज्यपाल (Governor) विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळाला. दरम्यान, आता रिक्त होत असलेल्या 10 जागा राज्यपाल नामनियुक्त सदस्यांच्या जागा आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुले विधानपरिषद निवडणूक 2020 (Legislative Council Election 2020) मध्ये आता राज्यपाल आणि राज्य सरकार संगनमताने निवड करणार की पुन्हा एकदा नवा संघर्ष महाराष्ट्र पाहणार याबाबत उत्सुकता आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी 10 जागा आता रिक्त झाल्या आहेत. येत्या 15 जूनल आणखी 2 जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे विधानपरिषदेच्या एकूण 12 जागांसाठी निवडणूक पार पडू शकते.

विधानपरिषद कार्यकाळ संपलेले आमदार आणि त्यांचे पक्ष

क्र आमदाराचे नाव पक्ष
1. हुस्नबानू खलिफे काँग्रेस
2. जनार्दन चांदूरकर काँग्रेस
3. आनंदरावर पाटील काँग्रेस
4. रामहरी रूपनवर काँग्रेस
5. प्रकाश गजभिये राष्ट्रवादी
6. विद्या चव्हाण राष्ट्रवादी
7. राहुल नार्वेकर राष्ट्रवादी
8. ख्वाजा बेग राष्ट्रवादी
विधानसभा निवडणुकीवेळी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले आमदार
9. राहुल नार्वेकर  
10. रामराव वडकुते  
एकूण 10

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष?

विधानपरिषदेसाठी निवडल्या जाणाऱ्या 10 जागा या राज्यपालनियुक्त आहेत. त्यामुळे राज्यपालांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. या आधीची पार्श्वभूमी पाहिली तर, राज्य सरकार राज्यपालांना नावांची शिफारस करत असत आणि राज्यपाल त्या नियुक्तीवर निर्णय घेत असत. परंतू, गेल्या काही काळामध्ये राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहिला तर या वेळी काय घडते याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, विधान परिषद निवडणूक केवळ निमित्त; खडसे, मुंडे, तावडेंचा पत्ता कापून देवेंद्र फडणवीस आणि भाजपची नवी रणनिती)

दरम्यान, विधानपरिषदेवरुन कार्यकाळ संपलेले जवळपास सर्वच आमदार हे सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यामुळे या रिक्त जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह शिवसेना आणि काही प्रमाणात भाजपकडूनही अनेक जण उत्सुक आहेत. अशात राज्य सरकारने सूचवलेल्या नावांना पसंती देत राज्यपाल शिक्कामोर्तब करणार की सदस्य नियुक्तीचे निकष अधिक काटेकोरपणे पाळणार यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.