Gram Panchayat Election 2019: राज्यातील 557 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर जाली असून, येत्या 24 मार्च रोजी या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Gram Panchayat Election) मतदान पार पडणार आहे. तसेच, सरपंचपदांच्या (Sarpanch post election) 82 रिक्त जागांसाठीही निवडणूक होणार आहे. राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक पार पडेल. राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया (State Election Commissioner Jageshwar S Saharia) यांनी ही माहिती दिली. या वेळी बोलताना सहारिया म्हणाले, एप्रिल 2019 ते जून 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांबरोबरच थेट सरपंचपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील मतदान होईल.
ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:
ठाणे- 3, रायगड- 20, रत्नागिरी- 11, सिंधुदुर्ग- 4, नाशिक- 48, धुळे- 18, जळगाव- 12, अहमदगनर- 3, नंदुरबार- 5, पुणे- 20, सोलापूर- 8, सातारा- 44, कोल्हापूर- 3, औरंगाबाद- 3, उस्मानाबाद- 2, परभणी- 1, अमरावती- 1, अकोला- 14, वाशीम- 32, बुलडाणा- 2, नागपूर- 2, वर्धा- 298, चंद्रपूर- 1 आणि गडचिरोली- 2. एकूण- 557.
पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा:
ठाणे- 1, रायगड- 15, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 4, धुळे- 1, जळगाव- 2, अहमदगनर- 4, नंदुरबार- 1, पुणे- 3, सोलापूर- 3, सातारा- 6, सांगली- 2, कोल्हापूर- 8, बीड- 1, नांदेड- 6, उस्मानाबाद- 2, परभणी- 2, अकोला- 3, यवतमाळ- 1, वाशीम- 6, बुलडाणा- 2, नागपूर- 6. एकूण- 82.
नामनिर्देशनपत्रे, अर्जांची छाननी आणि चिन्हवाटप
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करु इच्छिणाऱ्या संभाव्य उमेदवारांसाठी नामनिर्देशनपत्रे (उमेदवारी अर्ज) 5 ते 9 मार्च 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. त्यांची छाननी 11 मार्च 2019 रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 13 मार्च 2019 पर्यंत आहे. तसेच, 13 मार्च या दिवशीच निवडणूक चिन्ह वाटप होईल. (हेही वाचा, नितीन गडकरींच्या गावात भाजप सत्तामुक्त; काँग्रेसला 'अच्छे दिन')
मतदान वेळ
निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीसाठी मतदारांना मतदान 24 मार्च 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत करता येईल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल.
मतमोजणी
मतदान पूर्ण झालेल्या सर्व ग्रामपांचायतींसाठी 25 मार्च 2019 रोजी मतमोजणी होईल.