State Government: उन्हामुळे राज्य सरकारने सर्व शाळांनी विद्यार्थ्यांसाठी निर्देष जारी केले आहेत. उष्णतेमुळे अनेक समस्या वाढू लागल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेतले आहे. विद्यार्थ्यांचा शाळा दुपारच्या सत्रात असतात. यावेळात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यास सवलत देण्यात येणार आहे अशा निर्देश राज्य सरकार कडून आला आहे. ( हेही वाचा- मुंबईत या भागात या दिवशी राहणार पाणीपुरवठा बंद, पाणी जपून वापरण्याचे आवाहन)
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व शाळांनी तापमानवाढीमुळे विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याबाबत सवलत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.या प्रस्तावाला राज्य सरकाने मान्यता दिली आहे. येत्या सोमवार (22 एप्रिल) पासून विद्यार्थ्यांना शाळेत गैरहजर राहण्याबाबत सवलत मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालकांना सुचना दिल्या. राज्यातील मराठवाडा, विदर्भात तापमानांने उच्चांकी गाठली आहे. त्यामुळे उपाय म्हणून राज्यातील विद्यार्थांना शाळेत गैरहजर राहण्यास सवलत देणे आवश्यक आहेत.
शाळेत या बाबत सर्व विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. उन्हामुळे मुलांच्या शरिरावर परिणाम होत असतो. आता पर्यंत राज्यात 40 अंशाहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे शक्यतो उन्हाच्या तडाखापासून शाळेय विद्यार्थ्यांचा बचाव होईल याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य शिक्षण मंडळासह इतर बोर्डाच्या शाळांनाही याबाबत पत्र पाठवण्यात आला आहे.