Water Cut | Image Used For representational Purpose | Pixabay.com

मुंबईत काही ठिकाणी पाणीकपात लागू करण्यात आली असून यावेळी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे पी दक्षिण विभागातील वीरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट, पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगांव (पूर्व) येथील जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. त्यामुळे 23 सकाळी 10 पासून आणि 24 एप्रिल सकाळी 10 पर्यंत मुंबईतील काही भागांत 100 टक्के पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. (हेही वाचा -  Mumbai Local Power Block: मुंबई मध्ये 19-21 एप्रिल दरम्यान मध्य रेल्वे कडून पॉवर ब्लॉक; हार्बर आणि मेन लाईन वर होणार 'हे' बदल)

गोरेगावकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. पी दक्षिण विभागातील वीरवानी इंडस्ट्रीयल इस्टेट, पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगांव (पूर्व) येथील जलवाहिनी बदलण्याच्या कामास्तव दिनांक 23 ते 24 एप्रिल दरम्यान 24 तासांसाठी काही भागांत 100 टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे,

या विभागातील पाणी पूरवठा राहणार बंद

1. पी दक्षिण विभाग - वीटभट्टी, कोयना वसाहत, स्‍कॉटर्स वसाहत, कामा इंडस्‍ट्रीयल इस्‍टेट, रोहिदास नगर व शर्मा इस्‍टेट इत्‍यादी (मंगळवार, दिनांक 23 एप्रिल 2024)

2. पी पूर्व विभाग - दत्त मंदीर मार्ग, दफ्तरी मार्ग, खोत कूवा मार्ग, खोत डोंगरी, मकरानी पाडा आणि हाजी बापू मार्ग, तानाजी नगर, कुरार गांव, रहेजा संकुल, साईबाबा मंदीर, वसंत व्‍हॅली, कोयना वसाहत (मंगळवार, दिनांक 23 एप्रिल 2024)

3. आर दक्षिण विभाग – बाणडोंगरी, कांदिवली (पूर्व) (मंगळवार, दिनांक 23 एप्रिल 2024)

4. पी दक्षिण विभाग - पांडुरंगवाडी, गोकूळधाम, जयप्रकाश नगर, नाईकवाडी, गोगटेवाडी, कन्‍यापाडा, कोयना वसाहत, आय. बी. पटेल मार्ग, यशोधाम, संतोष नगर, विश्‍वेश्‍वर मार्ग, प्रवासी इंडस्‍ट्रीयल इस्‍टेट, राजीव गांधी नगर, आरे मार्ग, श्रेयस वसाहत इत्‍यादी (बुधवार, दिनांक 24 एप्रिल 2024)

5. पी पूर्व विभाग - पिंपरी पाडा, पाल नगर, संजय नगर, एम. एच. बी. वसाहत, इस्‍लामिया बाजार, जानू कम्पाउंड, शांताराम तलाव, ओमकार लेआऊट, पिंपरी पाडा, चित्रावणी, स्‍वप्‍नापूर्ती, घरकुल, गोकूळधाम, यशोधाम, सुचिताधाम, दिंडोशी डेपो, ए. के. वैद्य मार्ग, राणी सती मार्ग (बुधवार, दिनांक 24 एप्रिल 2024)