Fire | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

अहमदनगर जिल्हा रूग्णालयात (Ahmednagar District Hospital) लागलेल्या आगीत (Fire) 11 कोविड 19 रूग्णांचा मृत्यू झाला. यात इतर तीन परिचारिकांसह अटक करण्यात आलेल्या डॉ. विशाका शिंदे यांचे निलंबन (Suspension) महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने (Health Department of Maharashtra) मागे घेतले आहे. या घटनेच्या दोन दिवसांनंतर अहमदनगर जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉ सुनील पोखर्णा, दोन वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेश डाखे आणि डॉ शिंदे आणि स्टाफ नर्स सपना पठारे यांना निलंबित करण्यात आले. तर अन्य दोन परिचारिकांची सेवा समाप्त करण्यात आली. त्या वैद्यकीय अधिकारी असल्याचा विचार करून आरोग्य विभागाने शिंदे यांच्या निलंबनाची घोषणा केली होती.

मात्र नंतर हे उघड झाले की ती पोस्ट ग्रॅज्युएट वैद्यकीय विद्यार्थिनी असून ती हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करत आहे. निलंबन मागे घेणारे पत्र, ज्याची एक प्रत माध्यमांकडे आहे, हे उघड झाले आहे. यापूर्वी प्रशासनाला वाटले होते की ती सरकारी नोकरीत वैद्यकीय अधिकारी आहे. मात्र नंतर जेव्हा त्यांना त्यांची चूक लक्षात आली तेव्हा त्यांनी तिचे निलंबन मागे घेतले, असे डॉ. शिंदे यांचे प्रतिनिधीत्व करणारे वकील मकासरे योहान यांनी सांगितले. हेही वाचा भारतीय रेल्वेकडून मुंबई सेंट्रल येथे पहिल्या पॉड हॉटेल 'अर्बनपॉड'चे अनावरण, जाणुन घ्या वैशिष्टये

माझी मुलगी फक्त वैद्यकीय विद्यार्थिनी आहे जी कोविड वॉर्डमध्ये तैनात होती. तिला अग्निशमनाचे कोणतेही प्रशिक्षण नाही, असे डॉ. शिंदे यांचे वडील राजेंद्र पोपट शिंदे यांनी सांगितले. रुग्णांच्या मृत्यूसाठी तिला जबाबदार धरता येणार नाही, असे म्हणत तिचे कुटुंबीय तिच्या सुटकेसाठी आंदोलन करत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर वैद्यकीय विद्यार्थी संघटना आरोप करत आहेत की राज्य सरकारकडून दोष हलविण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले जात आहे.

सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टरचे उपाध्यक्ष डॉ. प्रणव जाधव म्हणाले, रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी डॉक्टरांवर असते. ते अग्निशमन दलाचे जवान नाहीत. ज्या अधिकार्‍यांनी सुरक्षेच्या योग्य उपाययोजना न करता रूग्णालय चालू दिले. त्यांनाच मृत्यूसाठी जबाबदार धरले पाहिजे. निवासी डॉक्टरांना दोष देणे पूर्णपणे चुकीचे आहे.