भारतीय रेल्वेकडून मुंबई सेंट्रल येथे पहिल्या पॉड हॉटेल 'अर्बनपॉड'चे अनावरण, जाणुन घ्या वैशिष्टये
(Photo Credit - Twitter)

भारतातील (India) पहिले रेल्वे (Railway) स्थानकातले पॉड हॉटेल पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात सुरू करण्यात आले आहे. ज्याचे नाव आहे 'अर्बनपॉड' (Urbanpod) हॉटेल आहे. मुंबई (Mumbai) सेंट्रल रेल्वे (Central Railway Station) स्थानकावर बुधवारी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या भारतीय रेल्वेच्या पहिल्या पॉड हॉटेलची झलक रेल्वे मंत्रालयाने बुधवारी शेअर केली आहे. पॉड रूम किंवा या हॉटेलला कॅप्सूल हॉटेल असेही संबोधले जाते, आणि त्यात अनेक लहान कॉम्पॅक्ट खोल्या असतात ज्यात बेड असतात. या कॅप्सूल हॉटेल्सची संकल्पना जपानमध्ये उद्यास आली.  प्रवाशांना खिशाला झेपेल तेवढे, अनुकूल आणि चांगली निवास व्यवस्था देण्यासाठी ही व्यवस्था उगम पावली आहे. मुंबईच्या मध्यवर्ती म्हणजे सेंट्रेल रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी अर्बनपॉड उभारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ही संकल्पना घेतली आहे.

काय आहे पाॅड हॅाटेल संकल्पना?

पॉड हॉटेल म्हणजे ज्या प्रवाशांना काही तासांसाठी एखाद्या स्टेशनवर थांबायचे आहे, मात्र हॉटेलची सुविधा परवडत नसेल किंवा उपलब्ध नसेल अशा प्रवाशांसाठी पॉड हॉटेल अतिशय उपयुक्त ठरते. एका छोट्या कुपी किंवा कॅप्सूल प्रमाणे आपल्याला बसण्यासाठी, झोपण्यासाठी नाहीतर आराम करण्यासाठी हे पॉड असतात.  व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्यासाठी, शैक्षणिक सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी, सोलो ट्रिप किंवा बॅकपॅकर्स लोकांसाठी हे पॉड हॉटेल्स बेस्ट ऑप्शन असू शकतात. यासोबतच कुटुंब किंवा मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपसाठी देखील पॉड हॉटेल्स आहेत. असे पश्चिम रेल्वेचे CPRO सुमित यांनी सांगितले आहे.

भारतीय रेल्वेच्या अर्बनपॉड नावाच्या पॉड हॉटेलमध्ये 3 श्रेणींचा समावेश आहे - 30 क्लासिक पॉड्स, 7 महिला, 10 खाजगी पॉड्स, आणि एक पॉड दिव्यांग प्रवाशांसाठी. येथे क्लासिक आणि लेडीज पॉड्स एकाच अतिथीसाठी आहेत तर खाजगी पॉडमध्ये अतिरिक्त जागा आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष शौचालय देखील आहे. (हे ही वाचा MahaVitaran: कोल्हापूरमध्ये 62 शाळांचा विजपूरवठा तोडला, पुण्यात 792 शाळांचा वीजपूरवठा पूर्ववत; थकीत बिल वसूलीसाठी महावितरण आक्रमक.)

मुंबई सेंट्रल येथे पॉड रूमचे भाडे:

12 तासांसाठी पॉड हॉटेलसाठी, किंमत 999 रुपये आहे.

24 तासांसाठी पॉड हॉटेलची किंमत 1999 रुपये आहे.

12 तासांसाठी 12 लोकांसाठी एका खाजगी पॉडसाठी, किंमत 1,249 रुपये आहे.

24 तासांसाठी 12 लोकांसाठी एका खाजगी पॉडसाठी, किंमत 2499 रुपये आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पॉड रूम्स मोफत वाय-फाय देखील दिले आहे. तसेच हॉटेलच्या आवारात प्रवाश्यांनसाठी कॉमन एरियामध्ये वॉशरूम, सामान आणि शॉवर रूम वापरायल दिले आहे. हॉटेलमध्ये राहणाऱ्या प्रवाश्यांना हॉटेलमधील वातानुकूलित पॉड कॅप्सूलमध्ये टेलिव्हिजन, मोबाइल चार्जिंग पॉइंट आणि रीडिंग लाइट्स उपलब्धही करुन दिले आहे.