Maharashtra Government Lockdown Guidelines: महाराष्ट्र लॉकडाऊन गाईडलाईन्स; दिलासा मिळाला पण संभ्रम वाढला; स्थानिक प्रशासनावर भिस्त, दुकानदारांसमोर पेच
Lockdown Guidelines | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Government Lockdown Guidelines: कोरोना व्हायरस नियंणासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आणि राज्य सरकारने अंमलबजावणी केलेल्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आजपासून (सोमावर, 4 मे 2020) सुरु होत आहे. लॉकडाऊन (Lockdown) काळात असलेले कडक निर्बंध लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काहीसे शिथिल जरुर करण्यात आले आहेत. मात्र, सरकारी आदेश आणि त्यांच्या अंमलबजावणी बाबात स्पष्टता नाही. त्यामुळे नागरिक, उद्योजग, व्यवासायिक आणि काही प्रमाणात प्रशासनातही संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.

सरकारने राज्यातील काही भागांमध्ये, शहरांमध्ये मद्यविक्रीसह अन्य ‘एकल’(स्टँडअलोन) दुकाने उघडण्यास मान्यता दिली आहे. मात्र, ही दुकाने नेमकी कोणती? हे ठरविण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनास आहे. त्यामुळे राज्य सरकारचे आदेश स्थानिक प्रशासनाच्या ध्येय, धोरणांनुसार वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे पद्धतीने आणि निकशांनुसार लावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (हेही वाचा, मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, मालेगाव येथील कार्यालये, स्टोअर्स, दारूची दुकाने 4 मेपासून उघडणार नाहीत; राज्यातील लॉक डाऊनबाबत महाराष्ट्र शासनाने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे)

सरकारी आदेशात एकच नियम सर्वांना लागू अशी स्पष्टता नसल्याने आणि आदेशाची अंमलबजावणी स्थानिक प्रशासनावर असल्याने अर्थ आणि मतभिन्नता वाढू शकते. जसे की, एक दुकाने म्हणजे नेमके काय? यात कोणती दुकाने येतात. त्याचे निकष काय. मध्यविक्री आणि इतर दुकाने उघडताना त्यांना कोणत्या प्रकारची सूट किती प्रमाणात आहे. याबाबतही संभ्रम आहे.

आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे छोटी, मोठी शहरं आणि बऱ्यापैकी मोठी गावं यांमध्ये दुकाने रस्त्यालगत एका रांगेत असतात. अशा वेळी या दुकांनांतील नेमकी कोणती दुकाने सुरु करण्यास मुभा आहे. याबबत स्पष्टता नाही. तसेच, हा प्रश्न स्थानिक प्रशासनावर सोडण्यात आल्याने इथे वशिलेबाजी आणि खाबुगीरी होण्याचा धोका नाकारता येत नाही. कारण, आपले दुकान सुरु व्हावे यासाठी स्थानिक प्रशासनाची मनधरणी दुकानदारांना करावी लागू शकते, अशी भीती काहींना वाटते.