मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, मालेगाव येथील कार्यालये, स्टोअर्स, दारूची दुकाने 4 मेपासून उघडणार नाहीत; राज्यातील लॉक डाऊनबाबत महाराष्ट्र शासनाने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा (Lockdown) कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. येत्या 3 मे रोजी संपणारा लॉकडाऊन आता 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. यातच राज्यातील लॉकडाऊनबाबत महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत.

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, मालेगाव येथील कार्यालये, स्टोअर्स, दारूची दुकाने 4 मेपासून उघडणार नाहीत; राज्यातील लॉक डाऊनबाबत महाराष्ट्र शासनाने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा (Lockdown) कालावधी पुन्हा एकदा वाढवण्यात आला आहे. येत्या 3 मे रोजी संपणारा लॉकडाऊन आता 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. यातच राज्यातील लॉकडाऊनबाबत महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. मुंबई (Mumbai), पुणे (Pune), पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad), मालेगाव (Malegaon) या परिसरात कोरोनाचे अधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने या सर्व शहराचे रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, मालेगाव परिसरातील कार्यालये (Offices), दारुचे दुकाने (Liquor Shops), आणि 4 मेपासून उघडता येणार नाहीत, अशी घोषणा महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) केली आहे. तसेच या चारही शहरातील सर्व खाजगी आणि सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील झोन्सची यादी जाहीर झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला असून महाराष्ट्रात 14 जिल्हे रेड झोनमध्ये, 16 ऑरेंज तर 6 ग्रीन झोनमध्ये गेले आहेत. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, मालेगाव मध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे या चारही शहरांचा समावेश रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या तत्वानुसार, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये खाजगी आणि सरकारी कार्यालये सुरु करता येणार आहेत. तसेच दारुचे दुकाने आणि इतर दुकानेही उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे देखील वाचा- पुण्यात आज कोरोनामुळे आणखी 3 जणांचा मृत्यू; आतापर्यंत एकूण 103 नागरिकांचा बळी

मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्वीट-

राज्यात ज्या शहरांचा ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये समावेश आहे, अशा ठिकाणी असलेले खाजगी अथवा सरकारी कार्यालयात 33 टक्क्यांहून अधिक कर्मचारी उपस्थित राहू शकत नाहीत. तसेच सरकारी आणि खाजगी कार्यालयात कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी सेतू ऍप इंस्टॉल करणे अनिवार्य आहे. ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील नागरिकांना आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या सोशल डिस्टिंगच्या नियमाचे पालन करावे लागणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 03, 2020 12:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).