Representational Image (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुणे शहरात आढळून आले आहेत. यामुळे नागरिकामध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यातच कोरोनामुळे पुण्यात आणखी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 103 नागरिकांचा बळी गेला आहे. महाराष्ट्रात आज 790 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 12 हजार 296 वर पोहचली आहे. तर गेल्या 24 तासात 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. मात्र, अद्यापही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सकारात्मक बदल दिसून आला नाही.

पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण काही केल्याने कमी होताना दिसत नाही. त्यातच, रुग्ण आणि मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. 30 एप्रिलपर्यंत पुण्याचा मृत्यूदर राज्यातच नाही, तर देशात सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. देशाच्या मृत्यूदरापेक्षा पुण्याचा मृत्यूदर तब्बल 2.3 टक्‍क्‍यांनी जास्त आहे. गेल्या महिन्यापासून सातत्याने पुण्याचा मृत्यूदर सर्वाधिक असल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. पुणे शहरात आतापर्यंत 1 हजार 316 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 99 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, 285 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- चंद्रपुरात कोरोनाचा शिरकाव; जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट

एएनआयचे ट्वीट-

देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत. एवढेच नव्हेतर WHO सोबतही चर्चा झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.