COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्रातील झोन्सची यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीत ग्रीन झोनमध्ये असलेले चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे, याची माहिती अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांनी दिली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे, यापुढे चंद्रपुरातील नागरिकांना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोना विषाणूने संपूर्ण जगासह भारताला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारतातही कोरोनाचे जाळे अधिक वेगाने पसरत असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. देशात आतापर्यंत 1223 लोकांचा मृत्यू तर, एकूण 37 हजार 776 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आज 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, दिवसभरात 790 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 521 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येने 12 हजार 296 चा आकडा गाठला आहे. हे देखील वाचा- Lockdown च्या काळात राज्यात विविध गुन्ह्यांसाठी 3 कोटी 14 लाख रुपयांचा दंड वसूल; जाणून घ्या लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी केलेल्या विविध कारवायाविषयी

देशात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजण्यात येत आहेत. एवढेच नव्हेतर WHO सोबतही चर्चा झाल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. देशात लॉकडाउनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या कालावधीत आम्हाला उपाय योजना करण्यासाठी अवधी मिळेल असेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.