महाराष्ट्र पोलिस मुख्यालय (PC - Twitter)

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात तसेच देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. या लॉकडाऊन कालावधीत पोलिसांनी राज्यातील विविध भागात कारवाया केल्या. लॉकडाऊन काळात अनेक नागरिकांनी कायद्याचे उल्लंघन केल्याच्या घटना घडल्या. राज्यात संचारबंदी असताना अनेक नागरिकांनी त्याचे उल्लंघन केलं.

आतापर्यंत राज्यात कलम 188 नुसार 89 हजार 383 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 17 हजार 813 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विविध गुन्ह्यांसाठी राज्यात आतापर्यंत 3 कोटी 14 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (Coronavirus: नागपूरमध्ये गेल्या 24 तासांत 11 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह: जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 150 वर पोहोचली)

लॉकडाऊन काळात महाराष्ट्र पोलिसांनी खालील कारवाया केल्या आहेत.

  • अवैध वाहतूक करणाऱ्या 1242 वाहनांवर गुन्हे
  • 51 हजार 13 वाहने जप्त
  • परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या 15 गुन्ह्यांची नोंद
  • नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनाच्या 15 गुन्ह्यांची नोंद
  • विविध गुन्ह्यांसाठी 3 कोटी 14 लाख रुपयांचा दंड वसूल.
  • आतापर्यंत पोलिसांवर हल्ल्याच्या 171 घटना घडल्या आहेत. यातील 657 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी #Dial100 वर आलेल्या 82 हजार 128 कॉल्सची योग्य दखल घेतली आहे. तसेच Quarantine शिक्का असलेल्या 628 व्यक्तींना शोधून विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत. लॉकडाऊन काळात पोलीस अधिकारी-कर्मचारी यांनी अतिशय महत्त्वाचे काम केलं आहे. कोरोनाचा मुकाबला करताना 51 पोलीस अधिकारी आणि 291 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 23 पोलीस अधिकारी व 26 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 3 पोलिसांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.