राज्यातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग ओसरत असला तरी संकट अद्याप कायम आहे. नव्या वेरिएंटमुळे (New Variant) तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोकाही आहे. यातच दिवाळी (Diwali) अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळीच्या काळात संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच राज्य सरकारने दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना (Guidelines) जारी केल्या आहेत. या नियमांचे पालन करणे नागरिकांसाठी बंधनकारक असणार आहे. तर जाणून घेऊया काय आहेत हे नियम.... (Pune Corona Update: पुणे जिल्हा प्रशासनाने दिवाळी पहाट कार्यक्रमांना दिली परवानगी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती)
# सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि इतर कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करावे.
# राज्यातील धार्मिक स्थळे खुली झाली असली तरी दिवाळीचा सण घरगुती स्वरुपात साजरा करण्यात यावा.
# दिवाळीच्या काळात खरेदीसाठी बाजारात होणारी गर्दी टाळावी. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना बाहेर घेऊन जाणे टाळावे.
# फटाक्यांची आतिषबाजीमुळे वायू आणि ध्वनीप्रदूषणाची पातळी वाढते. तसंच त्याचा लोकांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे.
# दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली असून त्यासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्या नियमांचे काटेकोर पालन होईल, याचा काळजी घ्यावी. क्यतो असे कार्यक्रम ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह अशा माध्यमातून करण्यात यावेत.
# सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम/रक्तदान शिबिरे आयोजित करावेत. कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात यावी.
दरम्यान, मागील वर्षापासून सुरु झालेल्या कोरोना संकटामुळे अनेक सण, उत्सव कडक निर्बंधांमध्ये साजरे करावे लागले. सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्याने आणि लसीकरण सुरु असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.