Maharashtra Flood Relief: महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना 11,500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर, महाविकासआघाडी सरकारचा निर्णय, पाहा तरतुदी
CM Uddhav Thackeray | (File Photo)

राज्यात आलेल्या महापूराने (Maharashtra Flood) अनेक जिल्ह्यांमधील शहरं, गावांचा अतोनात नुकसान केले. प्रामुख्याने या पूराचा पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना आणि कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना फटका बसला. या पूराचा फटका बसलेल्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 11,500 कोटी रुपयांचा सहाय्यता निधी म्हणजेच पॅकेज (Maharashtra Flood Relief Package) जाहीर केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. त्यानंतर या निर्णयाची माहिती राज्याचे मतद आण पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी माहिती दिली. महापूर आल्यानंतर राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आढावा घेतला जात होता. मात्र, मदत जाहीर केली जात नव्हती. याबाबत अनेकांनी नाराजीही व्यक्त केली होती. दुसऱ्या बाजूला राज्य सरकार किती मदत जाहीर करते याबाबत उत्सुकता होती. अखेर ही मदत जाहीर झाली आहे.

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्त बागात मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी ही मदत वापरण्यात येईल. वडेट्टीवार यांनी या वेळी सांगतले की, एनडीआरएफच्या निकषाच्याही पुढे जाऊन ही मदत दिली जाईल. त्यासाठी पूरग्रस्तांच्या दुकानासाठी 50,000 आणि टपरीधारकांसाठी 10,000 रुपये मदत दिली जाईल. एखाद्या नागरिकाचे संपूर्ण घरच पडले असेल तर त्यास 1, 50,000 रुपयांची मदत केली जाईल. ज्यांच्या घराचे 50% नुकसान झाले असेल त्यांच्यासाठी 50,000 रुपयांचे आणि 25% नुकसान झालेल्यांसाठी 25,000 रुपयांची मदत केली जाईल. ज्यांचे अंशत: नुकसान झाले आहे त्यांच्या घरासाठी 15,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. (हेही वाचा, MVA Government on Governor: आपण मुख्यमंत्री नाही हे राज्यपालांनी समजून घ्यावे- महाविकासआघाडी सरकार)

अधिक माहिती देताना विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, आतापर्यंत काही प्राथमिक माहिती हाती आली आहे. त्या माहितीनुसार महापुरामुळे जवळपास 4 लाख हेक्टर शेतजमीनीचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे अद्यापही सुरु आहेत. काही भागात 80-85% तर काही ठिकाणी 90% पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे हाती येतील तशी मदत दिली जाईल. उद्यापासून पंचनामे झालेल्या भागात प्रत्यक्ष मदत वाटप सुरु केले जाईल.

मुख्यमंत्री कार्यालय ट्विट

दरम्यान, काही ठिकाणी एमएसईबी विभाग, मत्स्य व्यवसाय, ग्रामिण विवकास आदी विभागांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांनाही मदत केली जाईल. सार्वजनिक बांधकाम विभागालाही 25000 कोटी रुपये, तसेच नगर विकास विभागाने दिलेल्या नुकसानिचीही या पॅकेजमध्ये समावष्ठता करण्यात आली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 9 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. या मदतीमध्ये एनडीआरएफच्या निकषानुसार 4 लाख रुपये, मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख रुपये, तसेच ज्यांच्या नावावर सातबारा आहे त्यांना गोपीनाथ मुंडे अपगात विमा योजनेंतर्गत 2 लाख रुपये, याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले 2 लाख रुपये अशी एकूण 9 लाख रुपयांची मदत केली जाईल, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.