Maharashtra: हिंगोली मधील शेतकऱ्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नक्षलवादी होण्याची मागणी
Farmer | Photo Credits: PTI

Maharashtra: हिंगोलीतील (Hingoli)  सेनगाव जिल्ह्यातील ताकटोडा गावातील नामदेव पतंगे या शेतकऱ्याने त्याला नक्षलवादी होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे मागणी केली आहे. या संदर्भातील पत्र सुद्धा त्याने स्थानिक तहसिलदारांकडे सोपवले आहे. स्थानिक प्रशासन आणि सरकारचे शेतकऱ्यांच्या प्रति वागणूक पाहा त्यांनी हा निर्णय घेतला आहे.(Nalasopara Shokcer!!! वीज बिलाची रक्कम पाहून वाढले ब्लडप्रेशर,तुम्ही सुद्धा व्हाल शॉक)

पतंगे यांचे असे म्हटले की, बँकेकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज दिले जात नाही. शेतीचे नुकसान होऊन सुद्धा शेतीचा विम्याचा फायदा सुद्धा शेतकऱ्यांना होत नाही. या व्यतिरिक्त कर्जमाफी किंवा अन्य कोणताही फायदा त्यांच्यासह अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही आहे.

पतंगे यांनी आपल्या पत्रात असे म्हटले आहे की, तुम्ही जेव्हा प्रशासनाकडे कोणतीही गोष्ट विचारण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळी शासकीय कामात अडढळा आणण्याच्या नावावर कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल अशा धमक्या दिल्या जातात. आंदोलन केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही.(Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड अधिवेशनात मंत्रीच असणार की विकेट पडणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष)

तसेच शेतकऱ्यांच्या काही योजनांवर योग्य प्रकारे अंमल केले जात नाही. दरम्यान, कोरोना व्हायरस आणि तुफान पावसामुळे शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. या संबंधित सुद्धा जेव्हा प्रशासनाकडे सांगितले असता त्याकडे दुर्लक्ष केले जाते.